शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच; मुंबईत उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 05:59 IST

आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशी चलनाचा विनिमय दर यानुसार दोन्ही इंधनाचे दर ठरविले जातात. जागतिक बाजारातही कच्चा तेलाचे दर १३ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

नवी दिल्ली : तेल वितरण कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनंतर मंगळवारी पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा नव्या उच्चांकावर पोहोचले. भारतीय तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल- डिझेलच्या दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ केली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ८७.३० रुपये लिटर, तर डिझेलचे दर ७७.४८ रुपये लिटर झाले. मुंबईत पेट्रोल ९३.८३ रुपये लिटर, तर डिझेल ८४.३६ रुपये लिटर झाले.भारतातील पेट्रोल- डिझेलच्या दरांचा दररोज आढावा घेतला जातो. आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशी चलनाचा विनिमय दर यानुसार दोन्ही इंधनाचे दर ठरविले जातात. जागतिक बाजारातही कच्चा तेलाचे दर १३ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. काही मोठ्या तेल उत्पादकांनी तेल पुरवठ्यात कपात केली आहे. तसेच तेल बाजारात मागणी वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले, असे सूत्रांनी सांगितले. एप्रिलच्या डिलिव्हरीसाठी ब्रेंट क्रूडचे दर २९ सेन्टसनी अथवा ०.५ टक्क्याने वाढून ६०.८५ डॉलर प्रति बॅरल झाले. सूत्रांनी सांगितले की, सौदी अरेबियाने फेब्रुवारी आणि मार्चच्या तेल पुरवठ्यात अतिरिक्त कपात केली आहे. ओपेक देशांनी आधीच केलेल्या पुरवठा कपातीच्या व्यतिरिक्त ही कपात आहे. या निर्णयामुळे जागतिक तेल बाजारातील तेल पुरवठा खालावला आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल