शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
4
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
5
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
6
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
7
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
8
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
9
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
10
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
11
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
12
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
13
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
14
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
15
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
16
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
17
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
18
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
19
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
20
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू

पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:23 IST

Prashant Kishore Prediction on Modi 3.0: राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी सत्तेत येणार तर मोदीच असा दावा केला आहे. एनडीएला ३०३ जागा मिळण्याचे भाकीत त्यांनी केले आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी वातावरण असल्याचा दावा विरोधक करत असताना राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी सत्तेत येणार तर मोदीच असा दावा केला आहे. एनडीएला ३०३ जागा मिळण्याचे भाकीत त्यांनी केले आहे. तसेच मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असून त्यांचे ३.० सरकार कसे असेल यावरही त्यांनी भविष्यवाणी केली आहे. 

मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात पेट्रोलिअम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणण्यात येऊ शकतात, अशी मोठी भविष्यवाणी किशोर यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून याची मागणी होत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे महागाई वाढलेली आहे. सध्या पेट्रोल, डिझेल, एटीएफ आणि नैसर्गिक वायूसारखी पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेबाहेर आहेत. ही अजूनही व्हॅट, केंद्रीय विक्री कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्कामध्ये येतात. 

जर पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणले तर राज्यांना या करासाठी केंद्रावर अवलंबून रहावे लागणार आहे. यामुळे राज्यांचा याला विरोध आहे. सध्या पेट्रोलिअम उत्पादनांवर १०० टक्क्यांहून अधिक कर आकारला जातो. तर जीएसटीमध्ये सर्वात जास्त कराचा स्लॅब हा २८ टक्के आहे. यामुळे राज्यांच्या महसुलाचे मोठे नुकसान होणार आहे. 

याचबरोबर प्रशांत किशोर यांनी राज्यांच्या अधिकारांवर गदा आणण्यात येऊ शकते असेही भाकीत केले आहे. राज्यांच्या आर्थिक स्वायत्ततेला आळा बसू शकतो. तसेच मोदी सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी भुमिकेमध्ये संरचनात्मक आणि कार्यात्मक बदल होऊ शकतात असेही ते म्हणाले. राज्यांबाबत काय असेल भुमिका...केंद्र राज्यांना संसाधनांचे वितरण करण्यास उशीर करू शकते. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट (FRBM) चे नियम अधिक कडक केले जाऊ शकतात. यामुळे राज्यांच्या कर्ज उचलण्यावर अनेक बंधने येऊ शकतात, असेही किशोर यांनी म्हटले आहे. भौगोलिक-राजकीय समस्यांना सामोरे जाताना भारताची खंबीरता वाढेल, असा अंदाजही प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला.

कोणत्याही पक्षाला पन्नास टक्के मते मिळणार नाहीतविरोधकांकडे भाजपचा रथ रोखण्यासाठी तीन वेगळ्या आणि वास्तववादी शक्यता होत्या; परंतु आळशीपणा आणि चुकीच्या रणनीतीमुळे त्यांनी संधी गमावली. कोणत्याही पक्षाला पन्नास टक्के मते मिळणार नाहीत आणि २०१९ मध्ये भाजपलाही सुमारे चाळीस टक्के मते मिळाली होती. बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र या राज्यांमध्ये भाजपला फायदा होईल, तर ओडिशा, पश्चिम बंगालमध्येही भाजप क्रमांक एकचा पक्ष बनणार आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrashant Kishoreप्रशांत किशोरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४