शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतही पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त; केजरीवाल सरकारचा दिलासा, महाराष्ट्रात अद्यापही निर्णय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 12:48 IST

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या निर्णयाला दिल्ली सरकारने आज कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली.

नवी दिल्ली:दिल्लीच्या केजरीवाल सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. दिल्लीत सरकारने व्हॅट कमी करून पेट्रोल आठ रुपयांनी स्वस्त केले आहे. पेट्रोलवरील व्हॅट(मूल्यवर्धित कर) 30% वरुन 19.40% करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत सध्याच्या 103.97 रुपयांवरुन 95.97 रुपयांपर्यंत खाली आली आहे. पेट्रोलचे हे नवे दर आज रात्री 12 वाजल्यापासून लागू होतील.

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या निर्णयाला दिल्ली सरकारने आज कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली आहे. यापूर्वी राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात आला आहे. त्यानंतर आता दिल्लीतही हे पाऊल उचलण्यात आले आहे. सध्या दिल्लीत एक लिटर पेट्रोल 103.97 दराने उपलब्ध आहे, तर नोएडामध्ये पेट्रोलचा प्रति लिटर दर 95.51 आणि गुरुग्राममध्ये 95.90 रुपये आहे. त्यामुळे दिल्लीतील फिलिंग स्टेशनवर ग्राहकांची कमतरता होती. बहुतांश ग्राहक यूपी आणि हरियाणातून तेल आणत होते.

महाराष्ट्रातील जनतेला दिलासा कधी मिळणार ?वर्षाच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत होते. पण, दिवाळीनिमित्त मोदी सरकारने उत्पादन शुल्कात 5 आणि 10 रुपयांची कपात केली. त्यामुळे तेलाच्या किमती घसरल्या. यानंतर, एनडीए शासित राज्यांनी आपापल्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला होता. काही दिवसांनी पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारांनीही जनतेला दिलासा दिला. पण, अद्याप महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले नाहीत. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील आजचे दरसध्या मुंबईत पेट्रोल 109.98 आणि डिझेल 94.14 प्रति लीटरवर आहेत. तर, महाराष्ट्रातील प्रमुख शहरे असलेल्या पुण्यात पेट्रोल 109.31 आणि डिझेल 92.31 रुपये प्रति लीटर, औरंगाबादमध्ये पेट्रोल 111.64 आणि डिझेल 95.79 रुपये प्रति लीटर, नागपूरमध्ये पेट्रोल 109.71 आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लीटर, नाशिकमध्ये पेट्रोल 110.40 आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लीटर तर कोल्हापूरमध्ये पेट्रोल 110.09 आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लीटर आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलdelhiदिल्लीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल