शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या, का वाढलेत पेट्रोलचे भाव, कशामुळे पडतोय तुमच्या खिशावर भार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 14:23 IST

पेट्रोलच्या दरांनी गाठला गेल्या 16 वर्षांमधील उच्चांक

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले दर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दर विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. मुंबईत आज पेट्रोलचा दर 84.40 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर डिझेलचा दर 72.21 प्रति लिटरवर जाऊन पोहोचला आहे. याआधी सप्टेंबर 2013 मध्ये पेट्रोलचा दर 84.07 रुपये प्रति लिटर इतका होता. गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होत आहे. गेल्या वर्षी डिझेलचा दर दिल्लीत 67.57 रुपये, कोलकात्यात 70.12 रुपये, मुंबईत 71.94 रुपये आणि चेन्नईत 71.32 रुपये असा होता. दिल्लीचा विचार केल्यास 1 जुलैपासून पेट्रोलच्या दरात 13.15 रुपये, तर डिझेलच्या दरात 14.24 रुपये इतकी वाढ झाली आहे. या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरात दोन तृतीयांश वाढ झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 80 डॉलर प्रति लिटरवर पोहोचले आहेत. कशामुळे वाढल्या किमती?उत्पादनात झालेली घट: पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओपेकनं (पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना) कच्च्या तेलाचं उत्पादन कमी केलं आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनावर विपरित परिणाम झाला आहे. जगभरात इंधनाच्या मागणीत झालेली वाढ, सौदी अरेबियाच्या नेतृत्त्वाखाली तेल उत्पादक देशांनी कमी केलेलं उत्पादन, व्हेनेझुएलामधील तेल उत्पादनात झालेली घट आणि अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध यामुळे तेलाचे दर भडकले आहेत. कंपन्यांकडून नुकसान भरपाई सुरु: सरकारी पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि चलन विनियम दर लक्षात घेऊन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये बदल करतात. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आधी भाववाढ तात्पुरती रोखण्यात आली होती. या काळात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मतदान होताच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल  आणि डिझेलच्या दरात वाढ केली. कर्नाटक निवडणुकीनंतर दरांमध्ये वाढ: 12 मे रोजी कर्नाटक विधासनभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यानंतर 14 मेपासून पेट्रोल दरात 1.61 रुपये प्रति लिटर, तर डिझेलच्या दरात 1.64 रुपये प्रति लिटर इतकी वाढ झाली आहे. इंधन दरांमध्ये वाढ झाल्यानं महागाईदेखील वाढली आहे. 

मुंबईत इंधन दर देशात सर्वाधिक: देशातील सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळतंय. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 84.40 रुपये इतका होता. देशातील कोणत्याही भागात सध्या पेट्रोलचा दर इतका नाही.पेट्रोल, डिझेलच्या दर विक्रमी उंचीवर: गेल्या 16 वर्षांमधील किमती विचारात घेतल्यास 14 सप्टेंबर 2003 रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर 76.06 रुपये प्रति लिटर इतका होता. मात्र गेल्या 16 वर्षांमधील पेट्रोल, डिझेलच्या दरांचा हा विक्रम आता मोडीत निघाला. किमतींमध्ये करांचा किती वाटा?: पेट्रोलच्या किमतींचा विचार केल्यास त्यातील 50 टक्क्यांहून अधिक रक्कम राज्य आणि केंद्र सरकारनं लावलेल्या विविध करांमुळे द्यावी लागते. डिझेलच्या बाबतीत हे प्रमाण 40 टक्क्यांहून जास्त आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलCrude Oilखनिज तेलPetrol Pumpपेट्रोल पंप