शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Petrol-Diesel Price:आज 35-37 पैशांनी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव, जाणून घ्या आजचा दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 09:28 IST

मंगळवारी कच्च्या तेलाची किंमत 43 रुपयांनी वाढून 6,188 रुपये प्रति बॅरल झाली आहे.

नवी दिल्ली: मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यात दररोज वाढ होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती नवनवीन विक्रम करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तेलाच्या किरकोळ किमती स्थिर होत्या, पण बुधवारी (20ऑक्टोबर) पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 35-35 पैशांनी वाढवल्या आहेत. आज दिल्लीत पेट्रोल 106 रुपयांवर गेलं आहे तर डिझेल 95 रुपये प्रति लिटरच्या पातळीवर पोहोचलं आहे. याशिवाय, मुंबईतही आज पेट्रोल 35 पैसे आणि डिझेल 37 पैसे प्रति लिटर महाग झालंय, ज्यामुळे पेट्रोल 112 रुपये आणि डिझेल 102.89 रुपये प्रति लिटर झालं आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मागील सत्रात आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट कच्चे तेल 0.66 टक्क्यांनी वाढून 84.89 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं. तर, तेलाच्या ठोक किमतीतही मोठी उसळी पाहायला मिळाली होती. मंगळवारी कच्च्या तेलाची किंमत 43 रुपयांनी वाढून 6,188 रुपये प्रति बॅरल झाली आहे.

प्रमुख शहरांमधील आजचे दर

  • दिल्ली: पेट्रोल –₹106.19 प्रति लिटर; डिझेल - ₹94.92 प्रति लिटर
  • मुंबई: पेट्रोल – ₹112.12 प्रति लिटर; डिझेल – ₹102.89 प्रति लिटर
  • कोलकाता: पेट्रोल – ₹106.77 प्रति लिटर; डिझेल – ₹98.03 प्रति लिटर
  • चेन्नई: पेट्रोल –103.31 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹99.26 प्रति लिटर
  • बंगळुरू: पेट्रोल –109.89 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹100.75 प्रति लिटर
  • भोपाळ: पेट्रोल –114.81 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹104.15 प्रति लिटर
  • पटना: पेट्रोल –109.64 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹101.50 प्रति लिटर
  • लखनऊ: पेट्रोल –103.18 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹95.37 प्रति लिटर
  • चंडीगड: पेट्रोल –102.21 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹94.64प्रति लिटर

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा

तुम्ही एसएमएसद्वारे तुमच्या फोनवरून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑईल एसएमएस सेवेअंतर्गत मोबाईल नंबर 9224992249 वर एसएमएस पाठवू शकता. तुम्ही- RSP पेट्रोल पंप डीलर कोड टाईप करुन पाठवा. हा मेसेज पाठवल्यानंतर इंधनाच्या ताज्या किंमतीची माहिती तुमच्या फोनमध्ये येईल.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलCrude Oilखनिज तेलdelhiदिल्लीMumbaiमुंबई