नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत सतत घसरण होत असल्याने पेट्रोलची किंमत ९१ पैशांनी आणि डिझेलची किंमत ८४ पैशांनी कमी करण्यात आली आहे. गेल्या आॅगस्टपासून पेट्रोलचे दर कमी होण्याची ही सातवी आणि डिझेलचे दर कमी होण्याची तिसरी वेळ आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. या दरकपातीनंतर दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर ६३.३३ रुपये आणि डिझेल प्रति लीटर ५२.५१ रुपये दरात मिळेल. तर मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ७०.९५ आणि डिझेल प्रति लीटर ६०.११ रुपये दरात मिळेल. वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंधनाचे हे दर स्थानिक कर किंवा व्हॅटनुसार वेगवेगळे राहतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पेट्रोल ९१, डिझेल ८४ पैशांनी स्वस्त
By admin | Updated: December 1, 2014 02:57 IST