शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टात ५० टक्के मतांच्या व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी याचिका; आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 04:31 IST

२१ विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानयंत्रांमधील मतांची मोजणी करून निकाल जाहीर करण्यापूर्वी किमान ५० टक्के मतांची ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रातील नोंदींशी पडताळणी करणे सक्तीचे केले जावे यासाठी २१ विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाकेली असून त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.बिगर ‘रालोआ’ आघाडील पक्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत अशी याचिका करण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला होता. तेलगु देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे याचिकेतील मुख्य याचिकाकर्ते आहेत. सर्वोच्च न्यायालयातील शुक्रवारच्या कामकाजात ही याचिका सुनावणीसाठी दाखविण्यात आली आहे. याआधी २१ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन अशीच मागणी केली होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा करताना जी माहिती दिली त्यावरून ही मागणी अमान्य झालयचे स्पष्ट झाल्याने या पक्षांनी न्यायालयात धाव घेतली आहे.प्रत्येक मतदान केंद्रात झालेल्या मतदानापैकी ५० टक्के मतांची मतदानयंत्रातून व ५० टक्के मतांची व्हीव्हीपॅटमधून मोजणी केली जावी.या दोन्हींची पडतालणी करून नंतरच निकाल जाहीर केला जावा, अशी या पक्षांची मागणी आहे. मतदाराने केलेल्या मतदानाची लेखी नोंद व्हीव्हीपॅटमध्ये होते. ती पाहून आपण दिलेले मत योग्य प्रकारे नोंदले गेले आहे याची खात्री झाल्यावर मतदाराने बटण दाबले की मताच्या लेखी नोंदीची ती पावती मयदानयंत्राला जोडलल्या स्वतंत्र पेटीमध्ये पडते, अशी ही सोय आहे. मतदानयंत्रांमध्ये मतदानाच्या आधी किंवा मतदानानंतर काही हेराफेरी केली गेलेली नाही याची खातरजमा व्हावी यासाठी दोन्ही प्रकारची ५०-५० टक्के मते घेऊन मोजणी केली जावी, अशी या पक्षांची मागणी आहे.आगामी निवडणुकीत देशभरातील सर्व १० लाख मतदान केंद्रांवर मतदानयंत्रे व व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम १० मार्च रोजी जाहीर करताना निवडणूक आयोगाने असे सांगितले की, प्रत्येक मतदारसंघात सरधोपटपणे निवडलेल्या एका मतदानकेंद्रावरील एक मतदानयंत्र व एक व्हीव्हीपॅट यामध्ये झालेल्या मतांच्या नोंदणीची पडताळणी केली जाईल.

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक