शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

EVM वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका कोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला ठोठावला 10 हजारांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 21:32 IST

delhi high court : आपल्या देशातील अनेक पक्षांच्या नेत्यांचा सुद्धा ईव्हीएमवर विश्वास नाही. फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या  (EVM) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिका फेटाळून लावत दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेला प्रसिद्धीसाठी दाखल केलेली याचिका म्हटले आणि याचिकाकर्त्याला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याचिकाकर्त्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले, परंतु त्यांच्याकडे ईव्हीएमबद्दल काही खास माहितीही नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आगामी निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरने घेण्यात याव्या, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, जगातील अनेक देशांमध्ये ईव्हीएमऐवजी पुन्हा एकदा बॅलेट पेपरद्वारे निवडणुका सुरू झाल्या आहेत. ज्या देशांनी ईव्हीएम सुरूवात केली, ते सुद्धा पुन्हा बॅलेट पेपर निवडणुका घेत आहेत. आपल्या देशातील अनेक पक्षांच्या नेत्यांचा सुद्धा ईव्हीएमवर विश्वास नाही. फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.  

सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले की, असे काय आहे, ज्या आधारे तुम्ही हे सांगत आहात की,  ईव्हीएममध्ये अडथळा येऊ शकतो. यावर याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएमचा वापर असंवैधानिक घोषित केला आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयEVM Machineएव्हीएम मशीन