शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

PMC Bank : आरबीआयने पीएमसीवर घातलेल्या निर्बंधांविरोधात उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 06:38 IST

पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय)ने घातलेल्या निर्बंधांविरोधात उच्च न्यायालयात सोमवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई : पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय)ने घातलेल्या निर्बंधांविरोधात उच्च न्यायालयात सोमवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत आरबीआयने २३ सप्टेंबर रोजी पीएमसी बँकेवर सहा महिन्यांकरिता नियामक निर्बंध घातले. याविरोधात कन्झ्युमर अ‍ॅक्शन नेटवर्क या एनजीओने आणि अन्य आठ ठेवीदारांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.सुरुवातीला खातेदारांना महिन्यातून एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली. त्याविरोधात खातेदारांनी आवाज उठविल्यावर आरबीआयने सहा महिन्यांनी दहा हजार रुपये बँकेतून काढण्याची परवानगी दिली. त्यामुळे खातेदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.त्याशिवाय आरबीआयने पीएमसीला नव्याने कर्ज देण्यास किंवा ठेवी स्वीकारण्यास मनाई केली आहे. आरबीआयकडून घालतण्यात आलेल्या या निर्बंधांमुळे त्याला विरोध करत याप्रकरणी खातेदार व ठेवीदारांनी आंदोलन सुरू करत बँकेत अडकून पडलेले पैसे परत करण्याची मागणी केली.अशा प्रकारे ३५ वर्षे जुन्या बँकेवर निर्बंध टाकण्याच्या आरबीआयच्या निर्णयावर याचिकाकर्त्यांनी टीका केली आहे. ‘आरबीआयचा हा निर्णय न पटणारा व मनमानी आहे. सामान्य माणसांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. स्वकष्टाने कमाविलेले पैसे बँकेत अडकले आहेत. त्यामुळे आरबीआयचा निर्णय रद्द करावा,’ अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.अशी परिस्थिती ओढावू नये, यासाठी अधिक काटेकोर नियम करण्याचा आदेश आरबीआयला द्यावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकCourtन्यायालय