शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

अरबी समुद्रातील शिवस्मारक योजना रद्द करण्यासाठी याचिका; यथावकाश होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 05:25 IST

नौदलाचे निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल आय. सी. राव, ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी द. म. सुकथनकर, वनशक्ति ट्रस्ट आणि आदिवासी कोळी समाज समन्वय समिती यांच्याकडून ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: ६,२०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करून मुंबईजवळच्या अरबी समुद्रात अश्वारूढ पुतळ््यासह छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची महाराष्ट्र सरकारची योजना बेकायदा आणि वायफळ खर्चाची असल्याने ती रद्द करावी, अशी विनंती करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.नौदलाचे निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल आय. सी. राव, ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी द. म. सुकथनकर, वनशक्ति ट्रस्ट आणि आदिवासी कोळी समाज समन्वय समिती यांच्याकडून ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकील अ‍ॅड. रोनिता भट्टाचार्य यांचे म्हणणे थोडक्यात ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस जारी केली.समुद्रात होणााऱ्या या स्मारकामुळे पर्यावरणाची भरून न काढता येणारी अशी अपरिमित हानी होणारआहे, पर्यावरणाची हानी होणे हे गंभीर आहे, असा मुद्दा अ‍ॅड. भट्टाचार्य यांनी प्रामुख्याने मांडला. ही योजना जाहीर झाल्यापासून अरबी समुद्रात होणाºया या शिवस्मारकासाठी निवडण्यात आलेल्या ठिकाणाची अयोग्यता, त्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम तसेच येथील मच्छिमार समाजातील १५ हजार लोकांच्या चरितार्थाची यामुळे होणारी हानी यावरून अनेक वाद निर्माण झाले आहेत.अरबी समुद्रात होणाºया या शिवस्मारकाच्या डिझाईनमध्ये त्रुटी असल्याची व त्या ठिकाणचा समुद्राचा तळ स्मारकाच्या बांधकामाचे आठ लाख टनांचे ओझे पेलू शकेल का, हा प्रश्न आहे. याविषयी राज्य सरकारच साशंक आहे, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.याचिकेतील प्रमुख आव्हान देणारे मुद्देया स्मारकासाठी दिलेल्या परवानग्या व पर्यावरणीय संमती कायदा आणि नियमांचे उल्लंघन करून देण्यात आली आहे.पूर्ण झाल्यावर या स्मारकास दररोज १० हजार पर्यटक भेट देतील व गर्दीच्या वेळी ही संख्या तासाला चार हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे शहराच्या त्या भागात आधीच असलेली वाहतूक समस्या आणखीनच बिकट होईल.या नियोजित स्मारकापासून जेमतेम २०० मीटर अंतरावर समुद्राच्या तळाशी विदेश संचार निगमच्या ५००० व्होल्टच्या केबल टाकलेल्या आहेत. यामुळे तेथे येणारे पर्यटक व स्मारकासाठी टाकला जाणारा भराव यांच्या सुरक्षेस संभाव्य धोका आहे.राज्य सकारकडे निधीची चणचण असताना आणि कल्याणकारी योजनांसाठी पुरेसा पैसा देणे शक्य होत नसताना या स्मारकावर केला जाणारा खर्च अनाठायी आहे.

टॅग्स :Shiv Smarakशिवस्मारकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय