शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींच्या सभेत व्यक्ती चक्कर येऊन पडला; पंतप्रधानांनी तात्काळ आपल्या टीमला दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 17:13 IST

पालम एअरपोर्टबाहेर पीएम मोदी उपस्थितांना संबोधित करत होते, तेव्हा अचानक एका व्यक्तीला चक्कर आली.

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीस दौऱ्याहून परतल्यानंतर शनिवारी बंगळुरुत इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांना संबोधित केले आणि चंद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीत पोहोचल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे सर्व नेते उपस्थित होते. पालम विमानतळावर पंतप्रधान मोदी भाषण करत असताना एक व्यक्ती बेशुद्ध पडला, यानंतर पंतप्रधानांनी तात्काळ आपल्या टीमला निर्देश दिले.

पंतप्रधान मोदी जेव्हा उपस्थित लोकांना संबोधित करत होते, त्यावेळी तिथे एक व्यक्ती बेशुद्ध पडली. पीएम मोदींची नजर या व्यक्तीवर पडताच त्यांनी आपल्या टीममधील डॉक्टरांना त्या व्यक्तीवर उपचार करण्याचे निर्देश दिले. यानंतर डॉक्टरांच्या टीमने त्या व्यक्तीवर प्रथमोपचार केला. विमानतळावर लोकांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, 'हे माझे भाग्य आहे की तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या प्रमाणात इथे आलात आणि चंद्रयानच्या यशाचा आनंद साजरा केला. यासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.'

चंद्रयानाचा उल्लेख पंतप्रधान म्हणाले, 'आज चंद्राच्या ज्या भागावर चंद्रयान-3 लँड करण्यात आले, त्या भागाला शिवशक्ती नाव देण्यात आले आहे. जेव्हा शिवचा उल्लेख निघतो, तेव्हा सर्व शुभ होते आणि शक्तीचा उल्लेख होतो, तेव्हा देशाच्या स्त्री शक्तीची चर्चा होते. शिवचा उल्लेख केला तर हिमालयाचा विचार येतो आणि शक्तीचा विचार केला की कन्याकुमारी विचारात येते, हीच भावना हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत प्रतिबिंबित करण्यासाठी शिवशक्ती हे नाव निश्चित केले आहे.'

G20 साठी लोकांना आवाहन

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारत G-20 परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहे, त्यामुळे 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत दिल्लीत अनेक उपक्रम होतील. येत्या काही दिवसांत काही गैरसोय होऊ शकते, त्यामुळे मी आजच दिल्लीच्या जनतेची माफी मागतो. आपल्या देशात येणारे पाहुणे आपल्या सर्वांचेच आहेत, त्यांच्यामुळे तुमची काही गैरसोय होईल. म्हणून, एक कुटुंब म्हणून, विनंती आहे की, हा G-20 भव्य-दिव्य, रंगीबेरंगी व्हावा, यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, हा माझा पूर्ण विश्वास आहे.'

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीChandrayaan-3चंद्रयान-3BJPभाजपा