शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला ३५ आठवड्यांनंतर गर्भपाताची परवानगी; कोलकाता उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 07:13 IST

शारीरिक दोष असलेल्या या बाळाला जन्म दिला तर त्याच्यावर तातडीने मणक्याची व डोक्याची शस्त्रक्रिया करावी लागेल.

कोलकाता : एका महिलेला ३५ आठवड्यांनंतर तिची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी कोलकाता उच्च न्यायालयाने दिली आहे. तिच्या पोटातील गर्भाच्या पाठीचा कणा व मेंदूमध्ये दोष असल्याने त्याच्या जगण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळेच उच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

गर्भधारणेच्या वैद्यकीय मार्गाने समाप्तीबाबतच्या १९७१च्या कायद्यातील तरतुदींच्या आधारे कोलकाता उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या कायद्यामध्ये केंद्राने गेल्या ऑक्टोबर महिन्यात सुधारणा केली होती. त्यानुसार विशिष्ट श्रेणीतील महिलांसाठी गर्भधारणा संपुष्टात आणण्याची मर्यादा गरोदर राहिल्यापासून २० ते २४ आठवडे अशी ठरविण्यात आली होती.

शारीरिक दोष असलेल्या या बाळाला जन्म दिला तर त्याच्यावर तातडीने मणक्याची व डोक्याची शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यानंतरही ते जगण्याची शक्यता खूपच धूसर आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी न्यायालयाला सांगितले. शस्त्रक्रियेनंतर समजा हे बाळ जगले तरी त्याला अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागेल. त्याच्या शरीराच्या काही अवयवांना लकवा होऊ शकतो. आतडी व मूत्राशयावर नियंत्रण नसणे अशा समस्याही उद्भवू शकतात, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले होते.  या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

पती-पत्नीने मिळून घेतला निर्णयमहिलेच्या गर्भाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च या संस्थेच्या संचालकांनी वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमावी, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला होता. या समितीच्या अहवालानंतर त्या महिलेला गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी न्यायालयाने दिली.महिलेच्या या अतिशय महत्त्वाच्या निर्णयाला तिच्या पतीचीही संमती होती.

गर्भाची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता या महिलेने सरकारमान्य रुग्णालयात जाऊन गर्भधारणा संपुष्टात आणावी, अशी परवानगी कोलकाता उच्च न्यायालयाने दिली. गर्भामध्ये अनेक शारीरिक दोष असल्याचे तीन वैद्यकीय तज्ज्ञांनी निदान केले होते. त्यामुळे मला गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी परवानगी द्यावी, अशी याचिका या महिलेने कोलकाता उच्च न्यायालयाकडे केली होती.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय