शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

"ज्या ज्या व्यक्तींनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला, त्यांना हुकूमशहांनी तुरुंगात डांबलं, हा इतिहास"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 18:48 IST

आपचे नेते मनीष सिसोदिया सध्या ईडीच्या कोठडीत असून तपास अद्याप सुरू आहे आणि तो महत्त्वाच्या टप्प्यावर आहे.

नवी दिल्ली - दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केल्यामुळे अद्यापही ते तुरुंगातच आहेत. त्यावरुन, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांनी यापूर्वीच मनिष सिसोदिया यांच्यावर राजकीय हेतुने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला होता. आता, पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे. 

आपचे नेते मनीष सिसोदिया सध्या ईडीच्या कोठडीत असून तपास अद्याप सुरू आहे आणि तो महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. मात्र, आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्याला आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यास अटक केल्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी अनेकदा संताप व्यक्त केला आहे. आता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतानाही केजरीवाल यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना हुकूमशहा म्हटलं आहे.  

ज्या लोकांनी मनिष सिसोदिया यांना तुरुंगात टाकलं ते देशाचे दुश्मन आहेत. इतिहास साक्षीला आहे, ज्या ज्या वेळी समाजात शिक्षणाचा प्रसार-प्रचार करण्याचं काम एखाद्या व्यक्तीने केलं, त्यांना त्यावेळच्या तानाशहांनी तुरुंगात टाकलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत की प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. बाबासाहेब, बाबासाहेब बनले कारण, त्यांनी पूर्ण शिक्षण घेतलं. आम्हाला वाटतं, देशातील प्रत्येक विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हावा, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता निशाणा साधला. 

दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी सीबीआयने मनिष सिसोदिया यांना ८ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर, दिल्ली अबकारी धोरण प्रकरण व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास यंत्रणेने सिसोदिया यांना ९ मार्च रोजी तिहार तुरुंगातून अटक केली. १० मार्च रोजी सिसोदिया यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी, ईडीने कोर्टाकडे सिसोदिया यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. 

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल