शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जी यांच्याबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेत प्रचंड संताप- अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 07:02 IST

Amit Shah : अमित शहा शनिवारपासून पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातल्या बोलपूर भागामध्ये भाजपने रविवारी अमित शहा यांचा भव्य रोड शो आयोजिला होता.

बोलपूर : पश्चिम बंगालमधील लोकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या राजवटीविरोधात प्रचंड संताप आहे. तेथील जनतेला आता बदल हवा आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सांगितले. या राज्यातील राजकीय हिंसाचार, खंडणीखोरी, बांगलादेशी घुसखोरांची समस्या या गोष्टींना लोक विटले आहेत, असेही ते म्हणाले. अमित शहा शनिवारपासून पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातल्या बोलपूर भागामध्ये भाजपने रविवारी अमित शहा यांचा भव्य रोड शो आयोजिला होता. त्यावेळी प्रचंड संख्येने आलेले भाजप कार्यकर्ते पाहून अमित शहा भारावून गेले. ते म्हणाले की, माझ्या आयुष्यात इतका भव्य रोड शो मी प्रथमच पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पश्चिम बंगालच्या जनतेचा विश्वास असून, त्यामुळेच या रोड शोला इतका मोठा प्रतिसाद मिळाला. अमित शहा म्हणाले की, भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला घृणास्पद होता. ममता बॅनर्जी यांच्या कारकीर्दीत पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार कळसाला पोहोचला आहे. त्यांच्या राजवटीत सुमारे ३०० भाजप कार्यकर्त्यांचा बळी गेला. ममता बॅनर्जी शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचा आव आणतात. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभांपासून वंचित ठेवले आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी