शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

जनतेला योगीमुक्त उत्तर प्रदेश हवाय; अर्थसंकल्पावरून अखिलेश यादव यांची टीका

By देवेश फडके | Published: February 22, 2021 4:34 PM

उत्तर प्रदेशचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना मोफत पाणी, कामगारांना तासानुसार पैसे, अयोध्या विकासासाठी १४० कोटींची योजना, अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम विमानतळ, उद्योग तसेच महिला, तरुण आणि आयटी क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली असून, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे हे अखेरचे बजेट ठरेल, असा दावा यावेळी यादव यांनी केला आहे.

ठळक मुद्देअखिलेश यादव यांची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकाजनतेला पेपरलेस बजेट नाही, योगीमुक्त उत्तर प्रदेश हवाय - अखिलेश यादवभाजप सरकार केवळ भांडवलदारांसाठी काम करतेय - अखिलेश यादव

प्रयागराज :उत्तर प्रदेशचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना मोफत पाणी, कामगारांना तासानुसार पैसे, अयोध्या विकासासाठी १४० कोटींची योजना, अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम विमानतळ, उद्योग तसेच महिला, तरुण आणि आयटी क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली असून, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे हे अखेरचे बजेट ठरेल, असा दावा यावेळी यादव यांनी केला आहे. (akhilesh yadav criticized on yogi government over budget)

योगी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. महागाई सातत्याने वाढत आहे. समाजवादी पक्षाने समाजातील प्रत्येक वर्गाला जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप सरकार केवळ भांडवलदारांसाठी काम करत आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. 

धोरण योग्य असेल, हेतू स्पष्ट असेल तर, नशीबही बदलतं: पंतप्रधान नरेंद्र मोदी

पेपरलेस नाही, योगीमुक्त उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमधील जनतेला पेपरलेस अर्थसंकल्प नकोय, तर योगीमुक्त राज्य हवे आहे, असा दावा अखिलेश यादव यांनी केला. समाजवादी पक्षाने केलेली जुनी कामे लोकांसमोर नव्याने मांडली. अर्थसंकल्प पूर्णपणे सादर केला नाही. जनतेपासून सत्य लपवले जात आहे, असा आरोपही अखिलेश यादव यांनी यावेळी बोलताना केला. 

दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेश सरकारचा अर्थसंकल्प ३७ हजार ४१० कोटी रुपयांनी वाढला असल्याचे सांगितले जात आहे. पेपरलेस बजेटसाठी सर्व सदस्यांना टॅबलेट पुरवण्यात आले होते. योगी सरकारचे हे पाचवे बजेट असून, यामध्ये २७ हजार ५९८ कोटी रुपयांची तरतूद नव्या योजनांसाठी करण्यात आली आहे, असे समजते. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव