शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' नंबरमुळे मोबाईलमधील माहितीची चोरी अशक्य; आधारचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 07:35 IST

आधारबद्दलच्या सर्व अफवा निराधार असल्याचं यूआयडीएआयनं म्हटलं आहे

नवी दिल्ली : हजारो मोबाईलमध्ये आपोआप आधार हेल्पलाईन नंबर सेव्ह झाल्यामुळे खळबळ उडाल्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरटी ऑफ इंडियानं स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकरणाचा हॅकिंग किंवा डेटा चोरीशी काहीही संबंध नाही, असं आधारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 'गुगलकडून चूक झाल्यानं आधारचा हेल्पलाईन नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाला. त्याचा गैरफायदा काही स्वार्थी हेतू असलेल्या व्यक्ती घेत आहेत. आधारबद्दल लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. आधारविरोधात वातावरण निर्माण करु पाहणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो,' असं यूआयडीएआयनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'गुगलकडून झालेल्या एका चुकीमुळे आधार हेल्पलाईन नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह झाला. त्यावरुन अनेकजण आधारविरोधात लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हेल्पलाईन नंबरच्या मदतीनं मोबाईलमधील माहिती चोरली जाऊ शकत नाही. ट्विटर आणि व्हॉट्स अॅपवर सध्या याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत', असं यूआयडीएआयनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

'मोबाईलमध्ये सेव्ह झालेल्या आधार हेल्पलाईन नंबरमुळे आधार कार्डवरील माहिती चोरीला जाऊ शकते. त्यामुळे हा हेल्पलाईन नंबर तातडीनं डिलीट करा, असे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र या नंबरमुळे माहितीची चोरी होऊ शकत नाही. त्यामुळे हा नंबर डिलीट करण्याची आवश्यकता नाही,' असं यूआयडीएआयनं ट्विटमधून स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर काहीजण आधारकडून झालेल्या चुकीचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी करत असल्याचा आरोपदेखील यूआयडीएआयनं केला आहे. आधारविरोधात गैरसमज निर्माण करण्याचा, लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. मात्र मोबाईलमध्ये सेव्ह झालेला तो क्रमांक फक्त आधारचा हेल्पलाईन नंबर आहे. तो नंबर आता आऊटडेटेडदेखील झालेला आहे. त्यामुळे यातून कोणतंही नुकसान होणार नाही. मोबाईलच्या कॉन्टॅक लिस्टमध्ये एखादा नंबर असल्यानं माहितीची चोरी होत नाही, असंही यूआयडीएआयनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइल