शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: निवारा छावण्यांतील लोक आता परतू शकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 02:42 IST

परराज्यात गेली असेल व ती तिथे आपल्या घरात राहात असेल तर अशांना पुन्हा त्यांच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी सरकारने व्यवस्था केलेली नाही, असेही केंद्राने म्हटले आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे परराज्यांत अडकून पडल्याने तेथील सरकार, स्वयंसेवी संस्थांनी सुरू केलेल्या निवारा छावण्यांमध्ये राहात असलेल्या सुमारे १४ लाख स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक आदींनाच घरी पाठविण्यासाठी प्रामुख्याने सध्या व्यवस्था केली जात आहे. त्याचदृष्टीने विविध राज्यांना आदेश देण्यात आल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.एखाद्या राज्यातील व्यक्ती कामधंद्यानिमित्त परराज्यात गेली असेल व ती तिथे आपल्या घरात राहात असेल तर अशांना पुन्हा त्यांच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी सरकारने व्यवस्था केलेली नाही, असेही केंद्राने म्हटले आहे. तशा आशयाचे पत्रक केंद्रीय गृह खात्याने या आठवड्याच्या प्रारंभी काढले.लॉकडाऊनमुळे देशातील शिक्षणसंस्था बंद आहेत. असंख्य विद्यार्थी परराज्यांत अडकून पडले आहेत. त्यांना घरी परतण्याची इच्छा आहे. अशा विद्यार्थ्यांपैकी जे हॉस्टेलमध्ये राहात आहेत त्यांची गणना अडकून पडलेल्या लोकांमध्ये करण्यात येणार नाही. पण ज्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात खरोखरच राहाण्यापासून अनेक गोष्टींचा सामना करावा लागतअसेल त्यांना घरी परतण्यासाठी सरकारने केलेल्या व्यवस्थेचा लाभ घेता येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या