शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
3
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
4
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
6
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
7
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
8
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
9
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
10
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
11
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
12
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
13
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
14
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
16
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
17
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
18
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
19
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
20
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

"कुंभमेळ्यात ६० लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा मी..."; बंगळुरुतल्या चेंगराचेंगरीवर CM सिद्धरामय्यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 09:16 IST

बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या विधानानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत

CM Siddaramaiah on Bengaluru Stampede: तब्बल १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीलएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यामुळे बंगळुरूच्या संघाचा विजयोत्सव बुधवारी साजरा करण्यात आला. मात्र काही वेळातच आरसीबीच्या आयपीएल विजयाचा उत्सव एका मोठ्या अपघातात बदलला. आरसीबीच्या संघातील क्रिकेटपटूंचा सत्कार सोहळा चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता. यासाठी स्टेडियमबाहेर लाखो चाहत्यांची गर्दी उसळली होती. परंतु, ही गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने तिथे चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४७ जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर राजकारणही पेटलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनेबाबत बोलताना कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे उदाहरण दिल्याने नवा वाद उफाळून आला आहे.

बुधवारी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बंगळुरुचा संघ विशेष विमानाने पोहोचल्यानंतर संघाला मिरवणुकीद्वारे चिन्नास्वामी स्टेडियमकडे घेऊन जाण्याचे नियोजन होते. मात्र  याचवेळी चेंगराचेंगरी झाली. ही घटना घडल्यानंतर खेळाडूंचा सत्कार सोहळा दहा मिनिटांत संपविण्यात आला. अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने म्हणजे सुमारे दोन ते तीन लाख लोक चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात जमले होते. चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत कर्नाटक सरकार देणार आहे, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी भाजपने कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला जबाबदार धरले आहे. काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. कोणतीही मूलभूत व्यवस्था नव्हती असा आरोप भाजपने केला. दुसरीकडे, कर्नाटक सरकारने जबाबदारी झटकून टाकली आणि क्रिकेट असोसिएशनला दोष दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपच्या प्रश्नांना उत्तर देताना महाकुंभ मेळ्यादरम्यानही चेंगराचेंगरीही झाली होती, असं म्हटलं आहे.

"अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. मी त्यांची तुलना करून आणि इकडेही तेच घडले असे म्हणून त्याचे समर्थन करणार नाही. कुंभमेळ्यात ५०-६० लोकांचा मृत्यू झाला होता. मी टीका केली नाही. जर काँग्रेस टीका करत असेल तर ती वेगळी बाब आहे. त्या घटनेवर मी किंवा कर्नाटक सरकारने टीका केली होती का?," असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.

"मला या घटनेचा बचाव करायचा नाही. आमचे सरकार या घटनेचे राजकारण करणार नाही. मी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि त्यांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. लोकांनी स्टेडियमचे दरवाजेही तोडले आणि चेंगराचेंगरी झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी येण्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. स्टेडियमची क्षमता फक्त ३५,००० लोकांची आहे, पण २-३ लाख लोक आले होते," असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. 

टॅग्स :Bengaluru Stampedeबंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरsiddaramaiahसिद्धरामय्या