शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मित्रों, मोबाईलची कॉन्टॅक्ट लिस्ट लगेच तपासा... आपोआप सेव्ह झालाय 'हा' क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 3:26 PM

सोशल मीडियावर अनेकांकडून स्क्रिनशॉट शेयर

नवी दिल्ली: देशातील हजारो मोबाईल वापरकर्त्यांना आज धक्का बसला आहे. युनिक आयडेन्टिफिकेशन ऑथॉरटी ऑफ इंडियाचा (यूआयडीएआय) मदत क्रमांक अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह झाला आहे. त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. याबद्दल आधारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अनेकांच्या मोबाईलमध्ये आज आधारचा मदतक्रमांक (1800-300-1947) सेव्ह झाला आहे. विशेष म्हणजे मोबाईल वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय हा क्रमांक फोनबुकमध्ये सेव्ह झाला आहे. यावरुन फ्रेंच सुरक्षातज्ञ इलियट अल्डरसन यांनी यूआयडीएआयला ट्विटरवरुन प्रश्न विचारला आहे. 'विविध मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांच्या भारतातील ग्राहकांच्या मोबाईलमध्ये आधार कार्डचा हेल्पलाईन नंबर सेव्ह झाला आहे. ग्राहकांच्या कोणत्याही परवानगीशिवाय हा नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करण्यात आला आहे. हे का करण्यात आलं आहे, ते समजेल का?', असा प्रश्न अल्डरसन यांनी यूआयडीएआयला विचारला आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आधारच्या गोपनीयतेचा संदर्भ देत आपली माहिती हॅक करुन दाखवावी, असं आव्हान दिलं होतं. शर्मा यांनी ट्विटरवरुन आव्हान त्यांचा आधार क्रमांक शेयर करत त्याला लिंक केलेली माहिती जाहीर करण्याचं आव्हान दिलं होतं. यानंतर एका हॅकरनं शर्मा यांचा मोबाईल क्रमांक, घरचा पत्ता, जन्म तारीख, पॅन क्रमांक अशी महत्त्वाची माहिती समोर आणली होती.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइल