शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लाेक ‘तारीख पे तारीख’ला कंटाळले, त्यांना हवी तडजाेड...; लोक अदालत सप्ताहात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 06:27 IST

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढे सांगितले की, लोक अदालत स्थापन करण्यात मला बार आणि बेंच असे सर्वांकडूनच खूप पाठबळ मिळाले. न्यायप्रक्रिया व्यापक व्हावी, यासाठी लोक अदालतीच्या प्रत्येक पॅनलवर २ न्यायमूर्ती आणि २ बारचे सदस्य राहतील, याची आम्ही खबरदारी घेतली.

नवी दिल्ली : लोक न्यायालयीन प्रकरणांना एवढे कंटाळले आहेत की, त्यांना आता केवळ तडजोड हवी आहे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी केले. 

सर्वोच्च न्यायालयात आयोजित विशेष लोक अदालत सप्ताहानिमित्ताने सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले की, लोक न्यायालयीन प्रकरणांना एवढे कंटाळले आहेत की, त्यांना कोणतीही तडजोड हवी आहे. बस्स, न्यायालयापासून आम्हांला दूर करा, एवढेच त्यांचे म्हणणे आहे. न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे एक शिक्षाच असून, ही बाब आपणा सर्वांसाठीच चिंतेची आहे. लोक अदालत हा तडजोडीसाठी उत्तम पर्याय आहे, असे चंद्रचूड म्हणाले.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढे सांगितले की, लोक अदालत स्थापन करण्यात मला बार आणि बेंच असे सर्वांकडूनच खूप पाठबळ मिळाले. न्यायप्रक्रिया व्यापक व्हावी, यासाठी लोक अदालतीच्या प्रत्येक पॅनलवर २ न्यायमूर्ती आणि २ बारचे सदस्य राहतील, याची आम्ही खबरदारी घेतली. मी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून देशभरातून अधिकारी आणण्याचा प्रयत्न केला आहे.

सुरुवातीला सात पीठांपासून लोकअदालतीला सुरुवात करण्यात आली होती. आम्ही यशस्वी होऊ काय, याबाबत आम्ही साशंक होतो. गुरुवारपर्यंत १३ न्यायपीठे झाली असून, त्यांच्याकडे भरपूर काम आहे. न्याय लोकांच्या घरापर्यंत घेऊन जाणे हा लाेक अदालतीचा हेतू आहे. प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणे हाही त्यामागील एक उद्देश आहे.     - डी. वाय. चंद्रचूड, सरन्यायाधीश

पहिली लोकअदालत भगवान श्रीकृष्णाने आयोजित केलीपहिली लोक अदालत भगवान श्रीकृष्णाने आयोजित केली होती. कौरव व पांडव यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रामधारीसिंह दिनकर यांच्या रचनेचा दाखला देत, भगवान कृष्णाने शांततेच्या मार्गाने समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचे कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले. विवाहाशी निगडित वादांवर तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी न्यायालयाचे कौतुक केले. कधी काळी कुटुंबातील वादावर घरातील वरिष्ठ नागरिक तोडगा काढत होते. आता मात्र वादावर तोडगा काढण्याचे काम व्यवस्थेला करावे लागत आहेत, असे मेघवाल म्हणाले. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय