शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माणसं मरत असताना राज्य सरकारांना फक्त निवडणुकीत रस; प्रदूषणावरून 'सर्वोच्च' कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 16:17 IST

दिल्लीतील प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयानं उपटले सरकारचे कान

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतल्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांची कठोर शब्दांत कानउघाडणी केली आहे. दरवर्षी दिल्लीतलं प्रदूषण वाढतं. मात्र प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काहीच पावलं उचलत नाही, असं म्हणत न्यायालयानं आपली नाराजी व्यक्त केली. पंजाब, हरयाणात शेतकरी तण जाळतात. त्यामुळे दिल्लीत प्रचंड प्रदूषण होतं. लाखो लोकांचं आयुष्य धोक्यात आणणाऱ्यांवर काय कारवाई केली जाते, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं यांनी राज्य सरकारांना विचारला. लोकांना जगण्याचा अधिकार आहे. मात्र एक व्यक्ती तण जाळते आणि दुसऱ्या व्यक्तीच्या जगण्याचा अधिकारच हिरावून घेण्याचा प्रयत्न करते, असं म्हणत न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठानं केंद्र आणि राज्य सरकारची खरडपट्टी काढली. दिल्लीतलं प्रदूषण कमी व्हायला हवं. यासाठी केंद्र पावलं उचलतंय की राज्य सरकार उपाययोजना आखतंय हे महत्त्वाचं नाही. मात्र दरवर्षी 10 ते 15 दिवस आम्हाला दिल्लीत अशी परिस्थिती पाहावी लागते, हे अतिशय वाईट असल्याचं न्यायालयानं म्हटलं. दिल्लीतल्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयानं पंजाब आणि हरयाणा सरकारला अतिशय कठोर शब्दांत सुनावलं. शेतकरी तण का जाळत आहेत, असा सवाल न्यायालयानं दोन्ही राज्य सरकारांना विचारला. यासाठी ग्रामपंचायती जबाबदारी आहेत, तर मग राज्य सरकारनं, प्रशासनानं त्यांच्याशी बातचीत केली का? असा प्रश्नदेखील न्यायालयानं उपस्थित केला. शेतातलं तण जाळून लोकांचं आयुष्य धोक्यात आणणाऱ्यांची नावं आम्हाला द्या, असे आदेशदेखील न्यायालयानं दिले. 

टॅग्स :delhi pollutionदिल्ली प्रदूषणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय