शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिंकलंस पोरा! ज्या ऑफिसमध्ये होता शिपाई, तिथेच झाला अधिकारी; पाचव्या प्रयत्नात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:45 IST

छत्तीसगड लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या शैलेंद्र कुमार बांधे यांनी कठोर परिश्रमाने राज्यातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. छत्तीसगड लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या शैलेंद्र कुमार बांधे यांनी कठोर परिश्रमाने राज्यातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शैलेंद्र हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) मध्ये बीटेक पूर्ण केल्यानंतर राज्य लोकसेवा आयोग (CGPSC) कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते.

शैलेंद्र यांनी पाचव्या प्रयत्नात CGPSC-२०२३ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाला. प्रत्येक निर्णयात साथ देणाऱ्या आई-वडिलांच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं, असं त्यांनी सांगितलं. शैलेंद्र म्हणाले की, या वर्षी मे महिन्यात त्यांची सीजीपीएससी कार्यालयात शिपाई म्हणून नियुक्ती झाली होती. ते बिलासपूर जिल्ह्यातील बिटकुली गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत. सध्या संपूर्ण कुटुंब रायपूरमध्ये राहतं.

रायपूरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) रायपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेकचं शिक्षण घेतलं. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकली असती, परंतु त्यांना सरकारी नोकरी करायची असल्याने त्यांनी 'प्लेसमेंट इंटरव्ह्यू'ला न जाण्याचा निर्णय घेतला. 

मी पहिल्याच प्रयत्नात प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही. पुढच्या वर्षी मुख्य परीक्षा पास होऊ शकलो नाही. तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात मला मुलाखत क्लिअर करता आली नाही. पण मी हार मानली नाही, पाचव्या प्रयत्नात मला यश मिळालं असं शैलेंद्र यांनी म्हटलं आहे. 

"कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. अशा परिस्थितीत मला शिपाई म्हणून काम करावे लागले. पण यासोबतच मी राज्य नागरी सेवा परीक्षेचीही तयारी करत राहिलो. कोणतीही नोकरी मोठी किंवा लहान नसते, कारण प्रत्येक पदाची स्वतःची प्रतिष्ठा असते. शिपाई असो वा उपजिल्हाधिकारी, प्रत्येक कामात प्रामाणिकपणे आणि पूर्ण जबाबदारीने करावं लागतं."

"काही लोक मला शिपायाचं काम करत असल्याबद्दल टोमणे मारायचे, चेष्टा करायचे पण मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. माझे आई-वडील, कुटुंब आणि ऑफिसमधील लोक यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि मला प्रोत्साहन दिलं'' असं शैलेंद्र यांनी म्हटलं आहे. मला आशा आहे की, माझा मुलगा सरकारी नोकरी मिळवून देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणा बनेल असं मुलाच्या यशाबद्दल वडिलांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी