शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेमा खांडू यांच्यावर बलात्काराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 05:39 IST

न्यायासाठी महिलेची सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी काही वर्षांपूर्वी आपल्यावर बलात्कार केला असा आरोप करणारी आणि याप्रकरणी स्थानिक न्यायालयांकडून नि:ष्पक्ष न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी मागणारी एक याचिका अरुणाचलमधील एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.पेमा खांडू व अन्य तिघांविरुद्ध यासंदर्भात तक्रार करूनही इटानगर पोलिसांनी गुन्हा न नोंदविल्याने व तेथील दंडाधिकाऱ्यांनीही तसा आदेश देण्यास नकार दिल्याने आपल्याला न्यायासाठी राज्याबाहेर दाद मागावी लागत आहे, असे या महिलेचे म्हणणे आहे.घडलेल्या कथित घटनेचा तपशील देताना ही महिला याचिकेत म्हणते की, त्यावेळी मी १५ वर्षांची होते व इटानगरमधील एका ‘पीसीओ’मध्ये काम करत होते. त्यावेळी फुर्मा लामा नावाचा एक इसम सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने आपल्याला भेटला.ही महिला म्हणते की, नंतर हा इसम मला काही लोकांना भेटण्यासाठी एका ठिकाणी घेऊन गेला. तेथे आणखी तीनजण होते. याचिकेत त्या इतर तिघांची नावे पेमा खांडू, सरकारी शाळेतील एक शिक्षक थुप्टेन ताशी व झिरो येथील सहाय्यक जिल्हा खनीकर्म अधिकारी दोरजे वांग्चुक अशी देण्यात आली आहेत. त्यावेळी मला जे थंडपेय देण्यात आले त्यात गुंगी आणणारे औषध मिसळलेले होते. थोड्या वेळाने मी बेशुद्ध झाल्यावर त्या चौघांनी माझ्यावर आळीपाळीने बलात्कार केला. शुद्ध आल्यावर झाला प्रकार लक्षात आला. पण तक्रार केल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी लामा याने दिल्याने भीतीने त्यावेळी आपण तक्रार केली नाही.ही महिला पुढे म्हणते की, त्यावेळी हे लोक नेमके कोण होते हे मला कळले नाही. परंतु सन २०१२ मध्ये पेमा खांडू अरुणाचलचे पर्यावरणमंत्री झाले व त्यांची छायाचित्रे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली तेव्हा आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांमध्ये खांडू हेही होते, याची आपल्याला खात्री पटली.

टॅग्स :Rapeबलात्कारArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश