शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Pegasus spyware row: पेगॅससच्या माध्यमातून अनिल अंबानींवरही पाळत?; उद्योजक वर्तुळात मोठी खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 22:58 IST

Pegasus spyware row: उद्योगपती अनिल अंबानी यांचा फोनदेखील टॅप झाल्याचा संशय

नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी समोर आलेल्या पेगॅसस प्रकरणानं एकच खळबळ माजवली. केंद्रीय मंत्री, न्यायाधीश आणि वरिष्ठ पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकाराला धारेवर धरलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये फोन टॅपिंगचा मुद्दा गाजला. पेगॅसस स्पायवेयरच्या माध्यमातून सरकार फोन टॅप करत असल्याचं वृत्त समोर आल्यानं राजकारण ढवळून निघालं. यानंतर आता नवी माहिती समोर आली असून त्यामुळे आणखी खळबळ माजण्याची शक्यता आहे.

पेगॅसस स्पायवेयरच्या माध्यमातून टॅप केल्या जाणाऱ्या फोन नंबर्सच्या यादीत उद्योगपती अनिल अंबानी यांचा नंबर होता असं वृत्त द वायरनं दिलं आहे. अंबानी यांच्यासोबतच दसॉ एव्हिएशनचे भारतातील प्रतिनिधी वेंकटा राव पोसिना यांचाही नंबर 'पोटिन्शियल टार्गेट्स'च्या यादीत होता, असं वृत्त द वायरनं दिलं आहे. राफेल प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना, भारतात आणि फ्रान्समध्ये त्याची जोरदार चर्चा असताना आणि फ्रान्सच्या तत्कालीन अध्यक्षांनी दसॉ कंपनीच्या भारतीय ऑफसेट भागिदाराबद्दल (रिलायन्स डिफेन्स) संशय व्यक्त केला असताना अनिल अंबानींचा फोन 'पोटेन्शियल टार्गेट्स'च्या यादीत होता. पेगॅसस स्पायवेयर तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ समूहानं विकसित केलं आहे. या स्पायवेअरचा वापर करून व्यक्तींवर पाळत ठेवता येते.

देशात राफेल विमानांच्या व्यवहारावरून वादळ उठलं असताना अनिल अंबानी आणि वेंकटा राव पोसिना यांचे नंबर टॅपिंगच्या यादीत होते. यांच्यासोबतच रिलायन्स एडीए समूहाचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख टोनी जेसुडॅसन आणि त्यांची पत्नी यांचेही मोबाईल क्रमांक त्या यादीत असल्याचं वायरनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. या व्यक्तींचे फोन नंबर 'पोटिन्शियल टार्गेट्स'च्या यादीत होते. त्यामुळे त्यांचे फोन टॅप झाले, असं म्हणता येणार नाही. डिजिटल फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच याबद्दल स्पष्टता होऊ शकेल.

टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानी