शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Pegasus Case: पेगासस प्रकरण; 5 फोनमध्ये मालवेअर पण स्पायवेअरचा पुरावा नाही- सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 13:46 IST

आज सरन्यायाधिशांसमोर पेगासस हेरगिरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी.

नवी दिल्ली: पेगासस हेरगिरी प्रकरणाची गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायमूर्ती आरव्ही रवींद्रन समितीच्या वतीने खंडपीठासमोर सीलबंद कव्हरमध्ये अहवाल सादर करण्यात आला. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने या अहवालाची दखल घेतली. सुनावणीदरम्यान वकील कपिल सिब्बल यांनी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली. याला सरन्यायाधीशांनी नकार दिला आणि न्यायालय या अहवालाची चौकशी करेल असे सांगितले. समितीच्या शिफारशी सार्वजनिक केल्या जातील असेही CJI म्हणाले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी महिनाभरानंतर होईल, असे आदेश रमणा यांनी दिले आहेत. समितीच्या तपासात केंद्र सरकारने सहकार्य केले नसल्याचे त्यांनी सांगितले. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, समितीच्या अहवालाचा विचार केला तर तांत्रिक समितीला 29 मोबाईल फोनमध्ये पेगासस वापरल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. यापैकी 5 मोबाईल फोनवर कोणत्या ना कोणत्या मालवेअरचा प्रभाव असल्याचे आढळून आले मात्र ते पेगाससचेच होते, असे पुरावे मिळाले नाहित.

तीन भागात अहवाल CJI म्हणाले की, अहवाल तीन भागात आहे. या समितीने कायद्यात सुधारणा करून तो अधिक कठोर करण्याची शिफारस केली आहे.  सरन्यायाधीशांनी अहवाल वाचून सहा पैलू सांगितले. ते म्हणाले, “समितीचा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही. असे 29 फोन होते ज्यात मालवेअर सापडले. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाकडे पेगासस होता.'' सध्याच्या सायबर कायद्यात काही सुधारणा केल्या पाहिजेत, असा सल्ला या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण?एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, 2019 मध्ये भारतातील किमान 1400 लोकांचे खाजगी मोबाईल किंवा सिस्टमची हेरगिरी केली जात आहे. यात 40 प्रसिद्ध पत्रकार, विरोधी पक्षाचे तीन मोठे नेते, घटनात्मक पदावर असलेले एक मान्यवर, केंद्र सरकारचे दोन मंत्री, सुरक्षा यंत्रणांचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी, दिग्गज उद्योगपती यांचाही यात समावेश असल्याचे सांगण्यात आले. बराच गदारोळ झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय