गराडे परिसरात वाटाण्याचे पीक जोरात
By admin | Updated: January 4, 2017 20:42 IST
गराडे : पुरंदर तालुक्यातील गराडे परिसरात वाटाणा पिके जोरात आली आहेत. सध्या रब्बी हंगामातील वाटाणा पिके फुलोर्यात आहेत. नगदी पीक म्हणून पुरंदर तालुक्यात शेतकरी वाटाण्याचे पीक घेतो. पुरंदरचे वाटाणा पीक प्रसिद्ध आहे. येथील वाटाण्याला खूपच मागणी असते. हा वाटाणा चविष्ट असून अनेक खवय्ये वाटाणा हंगामाची वाट पाहत असतात.
गराडे परिसरात वाटाण्याचे पीक जोरात
गराडे : पुरंदर तालुक्यातील गराडे परिसरात वाटाणा पिके जोरात आली आहेत. सध्या रब्बी हंगामातील वाटाणा पिके फुलोर्यात आहेत. नगदी पीक म्हणून पुरंदर तालुक्यात शेतकरी वाटाण्याचे पीक घेतो. पुरंदरचे वाटाणा पीक प्रसिद्ध आहे. येथील वाटाण्याला खूपच मागणी असते. हा वाटाणा चविष्ट असून अनेक खवय्ये वाटाणा हंगामाची वाट पाहत असतात.गराडे, सोमुर्डी, भिवरी, बोपगाव, चांबळी, हिवरे, कोडीत, पठारवाडी, आस्करवाडी, थापेवाडी, वारवडी या परिसरात अनेक शेतकर्यांनी वाटाण्याची पिके घेतलेली आहेत.ग्रामीण भागात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. वाढती थंडी पिकांना पोषक ठरत आहे. सुरुवातीला हवामानातील बदलामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसत होती. परंतु गेली ९ ते १० दिवस थंडीचा कडाका कायम आहे. पोषक हवामानामुळे वाटाणा पीक चांगलेच तरारले आहे. या वर्षी वाटाण्याचे उत्पादन चांगलेच वाढणार असल्याचे वाटाणा उत्पादक शेतकरी बाळासाहेब कटके यांनी सांगितले.फोटोओळी - भिवरी (ता. पुरंदर) परिसरात फुलोर्यात आलेले वाटाणा पीक.