शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाहनमालकाने जखमींच्या उपचारावर केलेला खर्च द्या; सुप्रीम काेर्टाचे विमा कंपनीला आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 10:35 IST

असा खर्च करणाऱ्या वाहन मालकांना  दिलासा देणारा हा  महत्त्वचा निर्णय आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती -

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने विमा असलेल्या वाहनाच्या अपघातात जखमीच्या उपचारासाठी वाहन मालकाने केलेल्या  खर्चाची परतफेड करण्याचे आदेश  विमा कंपनीला दिले आहेत. असा खर्च करणाऱ्या वाहन मालकांना  दिलासा देणारा हा  महत्त्वचा निर्णय आहे.

हेमराज यांनी आपल्या वाहनाचा  द न्यू इंडिया एशुरन्स कं.लि.कडून विमा काढला होता.  ही विमा पॅालिसी भारत व  नेपाळसाठी  होती. सप्टेंबर २०१४ मध्ये नेपाळमध्ये या वाहनाचा अपघात झाला. यात  एका महिलेचा मृत्यू व एक जण जखमी झाला. जखमीला लखनौ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. जखमीच्या उपचाराचा खर्च हेमराज यांनी केला. त्यांना अपेक्षा होती की, हा खर्च विमा कंपनी देईल; पण कंपनीने  उपचार खर्चाचा दावा नाकारला.

हेमराज यांनी जिल्हा ग्राहक मंच, मानसा (उत्तर प्रदेश) येथे तक्रार दाखल केली. ग्राहक मंचने विमा कंपनीला पॉलिसीनुसार दावा निकाली काढण्याचे निर्देश दिले. यानंतरही वैद्यकीय बिलांची परतफेड करण्यास विमा कंपनीने नकार दिला. हेमराज यांनी याविरुद्ध राज्य ग्राहक आयोगात अपील केले. राज्य आयोगाने हेमराज यांच्या बाजूने निकाल दिला. विमा कंपनीने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात अपील दाखल केले व ते मंजूर झाले. त्यानंतर हेमराज यांनी या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली हाेती. 

राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा आदेश रद्द -- न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि उज्ज्वल भुयान यांनी राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा आदेश रद्द केला आणि विमा कंपनीला ४ लाख रुपये व्याजासह हेमराज यांना देण्याचे आदेश दिले. - शिवाय विमा कंपनीला ३० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. हेमराज हे जखमींसाठी केलेल्या वैद्यकीय खर्चापासून तर वंचित आहेतच. - पण विमा असूनही त्यांना या न्यायालयात येण्यास भाग पाडल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने विमा कंपनीवर नाराजी व्यक्त केली. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्लीCourtन्यायालय