पवईत सराफाचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
पवईत सराफाचा आत्महत्येचा प्रयत्न
पवईत सराफाचा आत्महत्येचा प्रयत्न
पवईत सराफाचा आत्महत्येचा प्रयत्नमुंबई: पवईतील एका सराफाने दुकानातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी पवईत घडली. प्रल्हाद गुर्जर (३५) असे त्याचे नाव असून असून कर्जाला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याची शक्यता नातेवाईकांकडून वर्तविण्यात आली.पवई आयआयटी येथील चैतन्य नगर परीसरात गुर्जर यांचे आभुषण नामे ज्वेलर्सचे दुकान आहे. रविवारी दुपारच्या सुमारास गुर्जर यांनी दुकानाचे शटर आतून लॉक करत झोपेच्या गोळ्या खाल्या. बराच वेळ फोन करुनही प्रतिसाद येत नसल्याने त्याच्या पत्नीने अखेर त्याच्या दोघा मित्रांना कळविले. त्यांनी दुकानाकडे धाव घेत पोलिसांच्या मदतीने शटर उघडले असता, गुर्जर बेशुध्दावस्थेत आढळून आला. गहाण ठेवलेल्या दागिण्यांच्या व्यवहारामध्ये गुर्जर यांची फसवणूक होत त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. कर्ज परत करण्यासाठी खासगी सावकारांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून गुर्जर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली असून तपास सुरु असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी.के. महाडेश्वर यांनी सांगितले.