शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पटनायक पाचव्यांदा होणार मुख्यमंत्री; बुधवारी शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 04:17 IST

ओडिशात लोकसभा व विधानसभा निवडणुकांत आपला बालेकिल्ला शाबूत राखणारे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बिजू जनता दलाच्या (बिजद) विधिमंडळ नेतेपदी रविवारी एकमताने निवड करण्यात आली.

भुवनेश्वर : देशभरात मोदी लाट असतानाही ओडिशात लोकसभा व विधानसभा निवडणुकांत आपला बालेकिल्ला शाबूत राखणारे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बिजू जनता दलाच्या (बिजद) विधिमंडळ नेतेपदी रविवारी एकमताने निवड करण्यात आली. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिले आहे.नवीन पटनायक हे पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. १४६ सदस्य असलेल्या ओडिशा विधानसभेच्या निवडणुकांत बिजदने ११२ जागा जिंकल्या आहेत. तर राज्यातील २१ पैैकी १२ लोकसभा जागांवर या पक्षाने विजय मिळविला आहे. बिजद विधिमंडळ पक्षाच्या सुमारे पाऊण तास चाललेल्या बैठकीत नवीन पटनायक यांची नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी आमदारांसमोर बोलताना ते म्हणाले की, ओडिशाच्या विकासासाठी आता माझे सरकार आणखी जोमाने प्रयत्न करेल. नवीन पटनायक यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी भुवनेश्वरमधील एक्झिबिशन ग्राऊंडमध्ये बुधवारी होणार आहे.नवीन पटनायक यांनी ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. तसेच आपल्याला पाठिंबा देणाऱ्या ११२ आमदारांची यादीही सादर केली. विधानसभा निवडणुकांत बिजदला बहुमत मिळाल्याची खातरजमा करून राज्यपालांनी पटनायक यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे.एनडीएला सहकार्य करणार का?फोनी चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाची हवाई पाहणी केली होती. त्यावेळी ओडिशाला मदत करणाºया कोणालाही आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत असे सूचक विधान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केले होते. लोकसभा निवडणुकांत बहुमत मिळालेल्या एनडीएला पटनायक भविष्यात सहकार्याचा हात देतील का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Odisha Assembly Election 2019ओडिशा विधानसभा निवडणूक 2019