शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 18:38 IST

जनता दल युनायडेट(जेडीयू)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकीय चाणक्य समजले जाणा-या प्रशांत किशोर यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

पाटणा- जनता दल युनायडेट(जेडीयू)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकीय चाणक्य समजले जाणा-या प्रशांत किशोर यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्यांना पक्षाचं सदस्यत्व देण्यात आलं होतं आणि त्यांची थेट पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्याकडे नितीश कुमार यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे.प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून नितीश कुमारांचा भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच प्रशांत किशोरही जेडीयूमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यांनी जेडीयूच्या नेत्यांना नितीशकुमारांच्या स्वच्छ प्रतिमेला प्रचार करण्याचा सल्ला दिला आहे. 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकीतही प्रशांत किशोर चर्चेत होते. प्रशांत यांच्या रणनीतीचा नितीश कुमारांना फायदा झाला. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यापासून दुरावलेला जुना-जाणता शिलेदार पुन्हा एनडीएच्या गोटात दाखल झाल्यानं त्यांना मोठंच बळ मिळाल्याचं बोललं जातंय.निवडणूक जिंकणं ही एक कला आहे आणि प्रशांत किशोर यांनी त्यातील 'मास्टरी' सिद्ध केली आहे. भारतीय मतदारांची नाडी त्यांनी अचूक ओळखलीय. त्यामुळे 2012ची गुजरात विधानसभा निवडणूक असो किंवा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी 2014ची लोकसभा निवडणूक; प्रशांत किशोर यांनी चमत्कार करून दाखवला होता. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयानंतर, अमित शहा आणि त्यांचं काहीतरी बिनसलं होतं. त्यामुळेच बिहार विधानसभेच्या निवडणुकीत, त्यांनी मोदी-शहांऐवजी नितीश-लालूंसाठी रणनीती आखली होती आणि त्यांना सत्तेपर्यंतही पोहोचवलं होतं. पंजाबमध्ये त्यांनी काँग्रेसचं विजयाचं स्वप्न साकार केलं होतं. अर्थात, काही निवडणुकांमध्ये हा राजकीय चाणक्य काहीसा अपयशीही ठरला, पण आता नव्या जोमाने तो जेडीयूच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाला आहे. 

दुसरीकडे, प्रशांत किशोर यांच्या I-PAC या संघटनेनं तरुणांची भरती सुरू केली आहे. #NationalAgendaForum हा हॅशटॅग प्रत्येक ट्विटसोबत जोडला जातोय. महात्मा गांधींच्या विचारांचा आधार घेऊन ते तरुणांना जोडण्याची मोहीम राबवत ठळकपणे जाणवतंय. त्यातून प्रशांत किशोर यांची चलाखी सहज लक्षात येऊ शकते. तसेच प्रशांत किशोर यांच्या या अभियानाचा जेडीयूला फायदा मिळू शकतो.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNitish Kumarनितीश कुमार