शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 17:46 IST

धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशभरातील विविध ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता आज(मंगळवार) मुंबई, दिल्ली आणि पाटणासह देशातील 40 विमानतळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. ही धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच, पोलिस आणि सीआयएसएफने परिसराची झडती घेतली. सुदैवाने काहीही संशयास्पद आढळले नाही. यापूर्वी एप्रिलमध्येही विमानतळ अधिकाऱ्यांना अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या.

यापूर्वी दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती, पण त्यातही काही आढळले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी सकाळी 9.35 वाजता IGI विमानतळाच्या डायल ऑफिसला एक ई-मेल मिळाला, ज्यात दिल्ली-दुबई फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली, पण त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.

विशेष म्हणजे, यापूर्वी एप्रिलमध्ये जयपूर, नागपूर, कानपूर, गोवासह देशातील अनेक विमानतळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. विमानतळ अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने विमानतळाची झडती घेतली, मात्र काहीही सापडले नाही.

शाळांना बॉम्बच्या धमक्या याआधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील एका शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिस आयुक्तांच्या अधिकृत मेल आयडीवर हा धमकीचा मेल आला होता. त्यापूर्वी दिल्ली-एनसीआरमधील 150 शाळांना बॉम्बची धमकी मिळाली होती, त्यामुळे सर्वत्र दहशत पसरली होती. हा धमकीचा मेल दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्या अधिकृत मेल आयडीवर आला होता. धमकी दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास केला आणि तो फसवा कॉल असल्याचे निष्पन्न झाले. 

टॅग्स :AirportविमानतळBombsस्फोटकेBlastस्फोट