शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

SC/ST कायद्यावरून पासवानपुत्र आक्रमक; मोदी सरकारच्या डोकेदुखीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 18:58 IST

केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे नेते आणि अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या मुलानं मोदी सरकारलाच गंभीर इशारा दिला आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे नेते आणि अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या मुलानं मोदी सरकारलाच गंभीर इशारा दिला आहे. भाजपाबरोबर केलेली युती ही काही मुद्द्यांच्या आधारवर आहे, असंही एलजेपीनं स्पष्ट केलं आहे. तसेच दलितांवर होणा-या अन्यायाविरोधात कायद्यात कडक तरतूद केली पाहिजे आणि एनजीटीचे अध्यक्ष ए. के. गोयल यांना तात्काळ पदावरून पायउतार करा, अशी मागणीही चिराग पासवान यांनी केली आहे.दलित आणि आदिवासींच्या वाढत्या अत्याचारावर पक्षाचे नेते जनतेला तोंड देत आहेत. 2014मध्ये भाजपा आणि लोक जनशक्ती पार्टीमध्ये काही समाजांच्या हक्क्यांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर युती झाली आहे. आमचा पक्ष एससी/एसटी कायदा कायम ठेवण्यासाठी मोदी सरकारकडे अध्यादेश काढण्याची गेल्या चार महिन्यांपासून मागणी करत आहेत. परंतु अद्यापही तो काढण्यात आलेला नाही. केंद्र सरकारला 7 ऑगस्टपर्यंत अध्यादेश काढण्यास सांगितलं आहे. जेणेकरून अॅट्रॉसिटीचा पहिलाच कायदा कायम राहील. मोदी सरकारनं अध्यादेश न काढल्यास 2 एप्रिल रोजी केलेल्या विरोध प्रदर्शनापेक्षा 9 ऑगस्ट रोजी होणारं विरोध प्रदर्शन हे उग्र असल्याचे चिराग पासवान म्हणाले आहेत.मोदी सरकारनं दलितांविरोधात चांगल काम केल्यामुळेच त्यांच्याकडे आज बहुमत आहे. एसटी/एसटी अॅक्टमधला कॉमा आणि फुल स्टॉप काहीही बदलणार नसल्याचं मोदींनी आश्वासन दिलं होतं. परंतु जर मोदींनी अध्यादेश काढला नाही, तर आमचा पक्ष भाजपासोबत फारकत घेण्याचा विचार करेल, असा इशाराही चिराग पासवान यांनी दिला आहे. राष्ट्रीय हरित लवादचे सध्याचे अध्यक्ष ए. के. गोयल हे त्यावेळी अनुसूचित जाती, जमातीविरोधात निर्णय देणा-या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांमध्ये सामील होते. त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. आता सरकारनं त्यांची राष्ट्रीय हरित लवादाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. त्यामुळेच चिराग पासवान यांनी त्यांना हटवण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा