शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 11:31 IST

मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी  लाखो रूपयांचा डल्ला मारल्याची घटना उघड झाली आहे.

ठळक मुद्देमुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी  लाखो रूपयांचा डल्ला मारल्याची घटना उघड झाली आहे. प्रवाशांकडील तीन ते पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती मिळते आहे.राजस्थानमधील कोटा येथे बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली असून एक्स्प्रेसच्या एसी-२ टायर आणि एसी-३ टायर अशा नऊ डब्यांमधील प्रवाशांकडील ऐवज चोरीला गेला आहे.

कोटा, दि. 17- मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी  लाखो रूपयांचा डल्ला मारल्याची घटना उघड झाली आहे. प्रवाशांकडील तीन ते पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती मिळते आहे. राजस्थानमधील कोटा येथे बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली असून एक्स्प्रेसच्या एसी-२ टायर आणि एसी-३ टायर अशा नऊ डब्यांमधील प्रवाशांकडील ऐवज चोरीला गेला आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक्स्प्रेसमधील 24 प्रवाशांनी त्यांच्याकडील सामान चोरी झाल्याची तक्रार केली आहे. यापैकी अकरा जणांनी निजामुद्दीन जीआरपीकडे चोरी झाल्याची तक्रार केली तर काही जणांनी मथुरा जीआरपीकडे चोरीची तक्रार केल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

आणखी वाचारस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथराजौरीजवळच्या नियंत्रण रेषेवर जम्मू-काश्मीर सरकार बनवतंय 100 बंकर्स

प्रवाशांना पदार्थांमधून गुंगीचं औषध दिल्यानंतर झोप लागली. तेव्हा संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बॅगांमधील रोकड आणि दागिने चोरून तेथून पसार झाल्याचं या प्रवाशांनी तक्रारीत म्हंटलं आहे.. काही प्रवाशांची रिकामी केलेली पाकीटं आणि पर्स एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात सापडली, अशी माहितीही त्यांनी दिली.

माझ्याकडील एकुण 21 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरीला गेला. तसंच या एक्स्प्रेसमधील एकुण सात ते आठ कोचेसमध्ये चोरी झाल्याचं समजलं असल्याची माहिती एका प्रवाशाने दिली आहे.

प्रवासादरम्यान बोगीतील सर्व प्रवाशांना अचानक गाढ झोप लागली. झोपेतून उठल्यावर आमच्याकडील पाकीटं आणि मौल्यवान वस्तू गायब झाल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही लगेचच अटेंन्डंटला बोलावलं पण त्यांनी काहीही पाऊल उचलली नाही, असं एका प्रवाशाने म्हंटलं आहे.  या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा आयफोन, पासपोर्ट आणि अठरा हजार रूपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. 

याआधीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक्स्प्रेसमधील डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळं घटनांचं प्रमाण कमी झालं आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली आहे.