शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
3
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
4
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
5
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
6
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
7
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
8
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
9
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
10
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
11
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
12
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
13
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
14
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
15
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
16
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
17
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
18
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
19
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
20
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव

तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:32 IST

टाटा ग्रुपची Air India गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

Air India News: कल्पना करा की, तुम्ही विमानाचे तिकीट काढता आणि विमानतळावर वेळेत पोहोचता, पण तुम्हाला विमानात बसू दिले नाही. तुम्हाला सांगितले जाते की, विमानातील सर्व फुल्ल झाले आहे, त्यामुळे तुमच्यासाठी कारची व्यवस्था करण्यात आली आहे. अशावेळी तुमची काय अवस्था होईल..? गुजरातच्या भुज विमानतळावर एअर इंडियाच्या प्रवाशांची अशीच अवस्था झाली. 

काय घडले?अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताच्या घटनेपासून एअर इंडिया कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत येत आहे. गेल्या शनिवारी भुज विमानतळावर एअर इंडियाच्या प्रवाशांना एका विचित्र समस्येचा सामना करावा लागला. प्रवाशांनी मुंबईला जाण्यासाठी तिकीट काढले, मात्र एअर इंडियाकडून त्या प्रवाशांसाठी कारने जाण्याची व्यवस्था करण्यात आली. टाईम्स ऑफ इंडिया (TOI) च्या बातमीनुसार, एअर इंडियाचे विमान AI609 शनिवारी सकाळी 8:55 वाजता भुजहून मुंबईला जाणार होते. 

काही प्रवाशांनी चेक इन केले, बोर्डिंग पासही घेतले. परंतु 13 प्रवासी विमानात चढू शकले नाहीत. विमानात बसायला जागा नाही, असे या प्रवाशांना सांगण्यात आले. त्यातील बरेच प्रवासी कच्छ जिल्ह्यातील दुर्गम भागातून विमान पकडण्यासाठी आले होते. तांत्रिक कारणांमुळे एअर इंडियाने शेवटच्या क्षणी विमानात बदल केल्यामुळे ही समस्या उद्भवली होती. अशा परिस्थितीत, एअर इंडियाने त्या लोकांना कारने अहमदाबादला नेण्याची आणि नंतर त्यांना मुंबईला जाण्याची ऑफर दिली. काहींनी ऑफर स्वीकारली, तर काहींनी नाकारली. या गैरसोईबद्दल एअर इंडियाने दिलगीरी व्यक्त केली.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानGujaratगुजरात