शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

उडत्या विमानात सिगारेट पेटवल्यानं प्रवाशाला भोगावा लागला तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 17:40 IST

चेन्नईहून बँकॉकला जाणा-या विमानात सिगारेट पेटवणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे

नवी दिल्ली, दि. 3 - चेन्नईहून बँकॉकला जाणा-या विमानात सिगारेट पेटवणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे. बँकॉकला जाणा-या एअर एशिया फ्लाइटच्या क्रू मेंबर्सनं एका प्रवाशाला सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी इशारा दिला. तरीसुद्धा त्या प्रवाशांनं क्रू मेंबर्सची सूचना धुडकावत विमानात सिगारेट पेटवली. त्यानंतर विमान अधिका-यांनी त्या प्रवाशाला पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी प्रवाशाला दंड ठोठावला आणि त्याला समज देऊन सोडून दिलं. या प्रकाराची माहिती पायलटनं दिल्लीच्या एटीसीला दिली. विमानानं लँडिंग केल्यानंतर प्रवाशाला सीआयएसएफनं पकडून विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केलं. पायातील चप्पल काढून एअर इंडियाच्या कर्मचा-याला बेदम मारहाण करणाऱ्या शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना एअर इंडियासह अन्य विमान कंपन्यांनी नो फ्लाय यादीत टाकले होते. एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्या त्या कृत्याचा जाहीर निषेध करत त्यांना विमानातून प्रवास करण्यावर बंदी घातली होती. भारतातील सर्वच विमान कंपन्यांनी विमानप्रवास करण्याची बंदी घातल्यामुळे रवींद्र गायकवाड यांना प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये रेल्वेचा समावेश आहे. विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावर घातलेल्या बंदीच्या निर्णयाला टाटा समूहातील कंपन्यांनीही पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे व्हिसारा आणि एअर एशियाच्या विमानांमध्येही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.यापुढे गायकवाड यांना दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचा सहारा घ्यावा लागणार होता. रेल्वेशिवाय ते स्वत:च्या चार्टेट हेलिकॉप्टर किंवा गाडीने प्रवास करू शकतात, असंही स्पष्ट केलं होतं. अशा वेळी प्रवासात कमीत कमी वेळ खर्च व्हावा, अशी अपेक्षा असते. अशा परिस्थितीत रवींद्र गायकवाड रेल्वेने प्रवास करतील की नाही याबाबत थोडी शंकाच होती. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर रवींद्र गायकवाड रेल्वेने प्रवास करत असल्याने रेल्वे अधिका-यांनो सावधान राहा असे मेसेज फिरत आहे.