शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 22:37 IST

अहमदाबादवरून लंडनला जाणारे बोईंग ड्रीमलाइनर विमान १२ जून रोजी उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळले होते. या विमानातील २४२ जणांपैकी केवळ एकच भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक वाचला होता.

एअर इंडियाने AISATS च्या ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. हे अधिकारी अहमदाबाद विमान अपघातानंतर काही दिवसांतच ऑफिसात पार्टी करताना दिसून आले. एअर इंडियाने, हे असंवेदनशील असल्याचे ठरवत, असे वर्तन आपल्या मूल्यांशी सुसंगत नाही. जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, एअर इंडियाच्या विमानतळ गेटवे सेवा प्रदात्या AISATS च्या चार वरिष्ठ कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात संबंधित अधिकारी ऑफिसातच पार्टी करताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान क्रॅश झाल्याच्या काही दिवसांनंतरच AISATS च्या गुरुग्राम कार्यालयात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या अपघातात २५९ जणांचा मृत्यू झाला होता.

यासंदर्भात बोलताना एआयएसएटीएसचे प्रवक्ते म्हणाले,कंपनी, विमान क्रमांक एआय 171 च्या दुःखद घटनेमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांसोबत एकजुटीने उभी आहे. यावेळी त्यांनी संबंधित व्हिडिओसंदर्भात खेदही व्यक्त केला. 

प्रवक्त्याने सांगितले की, हे वर्तन आमच्या मूल्यांशी सुसंगत नाही. जबाबदार असलेल्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. सहानुभूती, व्यावसायिकता आणि जबाबदारी प्रति आम्ही वचनबद्ध आहोत. संबंधित चारही वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच अनेकांना इशाराही देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, AISATS, एअर इंडिया लिमिटेड ही टाटा समूहाचा भाग आहे.

अहमदाबादवरून लंडनला जाणारे बोईंग ड्रीमलाइनर विमान १२ जून रोजी उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळले होते. या विमानातील २४२ जणांपैकी केवळ एकच भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक वाचला होता. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटना