शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-एनसीआर भागात पावसाच्या तुरळक सरी; उत्तर भारतात थंडीचा कहर कायम

By देवेश फडके | Updated: January 2, 2021 10:29 IST

आगामी दोन दिवस दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ठळक मुद्देदिल्ली आणि परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्याउत्तर भारतातील काही भागात आगामी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यताथंडीचा कहर कायम राहणार असून, हिमालय क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : एकीकडे उत्तर भारतात थंडीचा कहर सुरू असताना दुसरीकडे आज सकाळी (शनिवार) राजधानी दिल्ली आणि परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्याची माहिती मिळाली आहे. राजधानी दिल्लीतील पारा १.१ अंशांवर गेला आहे. आगामी दोन दिवस दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीत ०२ जानेवारी ते ०५ जानेवारी या कालावधीत तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या काही भागात पुढील चार ते पाच दिवस नियमित अंतराने पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. हवामान विभागानुसार, रेवाडी, गुरुग्राम, सोनीपत, मथुरा, हाथरस, जिंद, पानीपत, करनाल, शामली, सहारनपुर, बागपत या भागांमध्ये पाऊस पडेल. पाऊस पडल्याने तापमानात आणखी घट होऊन आगामी दोन दिवसात दिल्लीवासीयांना शीतलहरीचा सामना करावा लागू शकेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

अफगाणिस्तान आणि लगतच्या काही परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो पाकिस्तानकडे सरकत आहे. यामुळे दक्षिण-पश्चिम राजस्थानावर याचा परिणाम जाणवर असून, तापमान आणखी कमी होईल. जम्मू-काश्मीरसह हिमालयीन क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टी होऊ शकेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.  

उत्तर भारतात थंडीचा कहर आगामी काही दिवस कायम राहणार असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये थंडीचा जोर आणखी वाढू शकेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, ०१ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीतील पारा १.१ अंशांपर्यंत खाली आला होता. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील बहुतांश भागात बर्फाची चादर पसरलेली आहे. जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग येथील तापमान उणे ९ अंशांवर गेले आहे. तसेच काश्मीर खोऱ्यातील अनेक भागातही तापमान उणे अंशांवर गेले आहे. 

 

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमानdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशHaryanaहरयाणाHimachal Pradeshहिमाचल प्रदेशJammu Kashmirजम्मू-काश्मीर