शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग अंत:प्रेरणेतून; स्वातंत्र्यसैनिकांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 01:35 IST

राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सत्कार; जुन्या आठवणींना दिला उजाळा

नवी दिल्ली : ब्रिटिशांनंतर, स्वतंत्र संस्थानांची जुलमी राजवट उलथून टाकण्याची गरज होती. स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्रात चळवळ उभारणे, कार्यकर्ते जमवणे, शस्त्र जमवणे, मोर्चे काढणे या माध्यमातून लढा दिल्याच्या आठवणींना उजाळा देताना अंत:प्रेरणेमुळेच स्वातंत्र्य संग्राम लढ्यात सहभागी होऊ शकल्याचे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी सांगितले.‘भारत छोडो’, गोवा, हैदराबाद व मराठवाडा मुक्तिसंग्रामात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील ९ स्वातंत्र्यसैनिकांचा शुक्रवारी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या स्वातंत्र्यसैनिकांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.नागपूरचे रतनचंद जैन म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीतील नेते आम्हाला शस्त्रे पुरविण्याचे काम सोपवायचे. लहान असल्यामुळे पोलीस आम्हाला कारवाई न करता सोडून द्यायचे. एकदा आम्ही ११ बंदुका जमिनीत पुरून ठेवल्या होत्या. नेत्यांना ताब्यात घेऊ न छळ करण्यात आला. त्यांनी बंदुका लपवल्याची माहिती पोलिसांना दिली. ते पाठीमागे लागताच आम्ही दहा बंदुका नदीत फेकल्या. मात्र, एक हस्तीदंती बनवलेली बंदूक आवडल्यामुळे ती बॅगेत ठेवली आणि पोलिसांच्या तावडीत सापडलो. त्याबद्दल सहा महिन्यांची कैद झाली.औरंगाबादमधील लक्ष्मण राधाजी उघडे म्हणाले की, निजामाकडून छळ व्हायचा. त्यामुळे आम्ही बंड पुकारले. निजामाच्या घरावर तिरंगा फडकावल्यानंतर सैन्याने गोळीबार केला. त्यात आमचे तिघे मारले गेले. आम्ही पळून जाण्यात यशस्वी ठरलो. शिवलिंग इरप्पा ऊर्फ वीरभद्र सिद्रामप्पा मडगे म्हणाले की, सप्टेंबर १९४८ मध्ये आम्ही लातूर जिल्ह्यात निजामाविरोधात बंड पुकारले. स्वातंत्र्यसैनिक अप्पाराव पाटील यांना शस्त्रे पुरविण्याची जबाबदारी आमच्यावर होती. आम्ही पुरविलेल्या शस्त्रांच्या जोरावर कार्यकर्त्यांनी अनेक सैनिकांची हत्या केली. सोलापूरवरून बीदरला शस्त्र आणताना पोलिसांना सापडलो आणि एक वर्षाची शिक्षा झाली. परभणीचे माधवराव कुलकर्णी यांनीही भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामातील लढ्याच्या आठवणी सांगितल्या.भाकरीच्या पापुद्र्याआडून...रझाकारांचा भयंकर त्रास होता. त्यामुळे आम्ही रामलिंग स्वामी, काशीनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. व्यापारी असल्यामुळे कार्यकर्त्यांना मदत करणे सोपे होते.माझ्या दुकानात साहित्य लपवून ठेवायचो. भाकरीच्या पापुद्र्यातून चळवळीच्या कागदपत्रांची देवाण-घेवाण करायचो. क्रांतीसिंह नाना पाटील, गोंविदभाई श्रॉफ यांचे मार्गदर्शन मिळाले, असे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील बीडचे बन्सी जाधव म्हणाले.