शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांची पेन्शन घटनाबाह्य नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:58 IST

खासदारांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याची राज्यघटनेत तरतूद नसली तरी संसदेने कायदा करून पेन्शन देण्याची तरतूद करणे घटनाबाह्य ठरत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली : खासदारांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याची राज्यघटनेत तरतूद नसली तरी संसदेने कायदा करून पेन्शन देण्याची तरतूद करणे घटनाबाह्य ठरत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.न्यायालय म्हणते की, खासदारांच्या पेन्शनबाबत उल्लेख नसणे याचा अर्थ राज्यघटनेने पेन्शन देण्यास बंदी केली, असा होत नाही. उलट खासदारांच्या भत्त्यांविषयी कायदा करण्याचा संसदेस अधिकार आहे. भत्त्यांमध्ये पेन्शनही गृहितधरून त्याची तरतूद करणे चुकीचे नाही.खासदारांचे वेतन व भत्तेविषयक कायद्यात संसदेने सन २००४, २००६ व २०१० मध्ये केलेल्या दुरुस्त्यांना आव्हान देणारी याचिका ‘लोकप्रहरी’ स्वयंसेवी संस्थेने केली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ती अमान्य केल्यानंतर आलेले अपील फेटाळताना न्या. जस्ती चेलमेश्वर व न्या. संजय कृष्ण कौल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. खंडपीठाने म्हटले की, खासदारांचे वेतन, भत्ते व पेन्शन हा धोरणात्मक विषय आहे व त्याचा कायदा कसा करावा हा संसदेचा सर्वाधिकार आहे. न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.घटनात्मक पदांवरील व्यक्तींच्या वेतन व पेन्शनविषयी राज्यघटनेत असलेल्या तरतुदींचा आढावा घेऊन न्यायालय म्हणते की, यानुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, सदस्य तसेच नियंत्रक व महालेखापाल (कॅग) यांच्या पेन्शनचा स्पष्ट उल्लेख आहे. याचा अर्थ इतरांना पेन्शन देण्यास मनाई केलेली नाही. ज्यांच्याकडून सचोटीने कर्तव्याचे पालन अपेक्षित आहे, त्यांना पायउतार झाल्यानंतर मिंधे व्हावे लागू नये यासाठी पेन्शनचा उल्लेख केला, एवढाच त्याचाअर्थ आहे.घटनासभेतील चर्चांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतरांनी व्यक्त केलेले विचार पाहता त्यांनी संसद सदस्यांना पेन्शन देणे निषिद्ध मानल्याचे दिसत नाही. उलट निवृत्त सदस्यांना पेन्शन देण्याच्या ब्रिटिश संसदेच्या प्रथेचे त्यांनी स्वागत केल्याचे दिसते. भारतातही राज्यघटना लागू झाल्यानंतर स्थापन होणारी संसद याची योग्य दखल घेऊनसुयोग्य कायदा करेल, अशीअपेक्षा घटनासभेने व्यक्तकेल्याचेही स्पष्ट होते, असे खंडपीठाने म्हटले.नोकर नसले तरी पेन्शनसंसद सदस्य सरकारी कर्मचारी नाहीत किंवा तो त्यांचा पेशा नाही. त्यांना पेन्शन देणे गैर आहे, असाही याचिकाकर्त्यांचामुद्दा होता. तो फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, हे गृहितकच चुकीचे आहे. पेन्शन निवृत्तांच दिले जाते असे नाही. विधवा, विकलांग व वृद्धांनाही पेन्शन दिले जाते ते निवृत्त सरकारी कर्मचारी म्हणून नव्हे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय