शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गाच्या विळख्यात अनेक खासदार, पावसाळी अधिवेशन लवकर संपणार- रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 14:51 IST

संसदेच्या कामकाजाचा कालावधी एक आठवड्यानं कमी केला जाऊ शकतो, असे दोन्ही अधिका-यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता वर्तवण्यात येत  आहे. 30 खासदारांना कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती संसदेच्या दोन वरिष्ठ अधिका-यांनी दिली. सध्या देशात 53 लाखांहून अधिक कोरोनाचे प्रकरणे नोंदली गेली आहेत. 14 सप्टेंबर रोजी सहा महिन्यांत पहिल्यांदाच संसद अधिवेशनाला सुरुवात झाली आणि 1 ऑक्टोबरपर्यंत काम करायचे होते, पण संसदेच्या कामकाजाचा कालावधी एक आठवड्यानं कमी केला जाऊ शकतो, असे दोन्ही अधिका-यांनी सांगितले.संसद अधिवेशनाच्या कार्यवाहीत सहभागी असलेल्या दोन अधिका-यांपैकी एकाने सांगितले की, अधिवेशन सुरू झाल्यापासून कोरोना पॉझिटिव्ह खासदारांची संख्या वाढली आहे, त्यामुळे सरकार अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा विचार करीत आहे. शनिवारपासून अधिवेशनासाठी संसदेत प्रवेश करणा-या पत्रकारांना सरकारने डेली अँटीजन टेस्टदेखील अनिवार्य केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या सचिवांनी कामकाज कमी करण्याशी संबंधित प्रश्नांना कोणतेही उत्तर दिले नाही. कोरोना संसर्ग झालेल्या खासदारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात रस्ते आणि वाहतूक मंत्री असलेल्या नितीन गडकरींचा समावेश आहे.नायडू यांच्या राज्यसभा सदस्यांना सुरक्षा उपायांचे पालन करण्याच्या सूचनादुसरीकडे राज्यसभा सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सांगितले की, परीक्षा हॉलमध्ये चिठ्ठ्या आदान-प्रदान करण्यास परवानगी नाही. परंतु कोरोना सुरक्षेच्या उपाययोजनांच्या दृष्टीने वरिष्ठ सभासद सदस्य एकमेकांशी संपर्क साधू शकतात.सभा सुरू झाल्यावर सभागृहात बसलेल्या अधिका-यांकडे कोणत्याही स्पष्टीकरणासाठी येऊ नये. तसेच त्यांनी एकमेकांच्या सदस्यांच्या जागेवर जाऊ नये, असा सल्ला नायडू यांनी वरच्या सभागृहातील सदस्यांना दिला. कोणतीही समस्या आवश्यक असल्यास आपण आपली चिठ्ठी पाठवू शकता.पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी, पत्रकार यांची अँटीजन टेस्ट अनिवार्यखासदारांना कोरोना विषाणूची लागण होण्याच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर नवीन प्रोटोकॉलनुसार संसद आवारात प्रवेश करणारे सर्व कर्मचारी आणि पत्रकारांसाठी दररोज अँटीजन तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. एका ज्येष्ठ संसद सदस्यानं सांगितले की, दोन्ही सभागृहाचे सदस्य विशिष्ट अंतरानंतर आरटी-पीसीआर तपासणी करीत आहेत. खासदार आरटी-पीसीआर तपासणी खासदार कितीही वेळा करू शकतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या