शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जगदीप धनखड यांच्याविरोधात काँग्रेस अविश्वास प्रस्ताव आणणार, सपा-टीएमसीचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 17:36 IST

Parliament Winter Session : विरोधकांनी जगदीप धनखड यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला आहे.

Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज खडाजंगी पाहायला मिळत आहे. अशातच, विरोधी इंडिया आघाडीने राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. धनखर यांच्या विरोधात इंडिया आघाडी एकत्र आली असून, समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसदेखील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या निदर्शनांपासून दूर राहिलेल्या टीएमसी आणि सपा खासदारांनीही अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष मंगळवारी राज्यसभेत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. अविश्वास प्रस्ताव तयार असून त्यावर 70 सदस्यांनी स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी राज्यसभेत जॉर्ज सोरोस यांच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळात सभापती जगदीप धनखड यांची भूमिका पाहता काँग्रेस त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित मुद्द्यावरून राज्यसभेत सोमवारी ज्याप्रकारे गदारोळ झाला, त्यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे सदस्य धनखर यांच्यावर नाराज आहेत.

सभागृहात गोंधळ सुरू असताना दिग्विजय सिंह ते राजीव शुक्लापर्यंत...काँग्रेसच्या खासदारांनी सभापतींवर पक्षपाताचा आरोप केला. दरम्यान, राज्यसभेच्या सभापतींना हटवण्यासाठी प्रस्तावावर 50 सदस्यांच्या सह्या आवश्यक असतात, पण या प्रस्तावावर 70 सदस्यांनी सह्या केल्या आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातदेखील विरोधकांनी सभापतींना हटवण्याचा प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती, मात्र विरोधकांनी तो स्थगित केल्याचे बोलले जात आहे.

सभापतींना हटवण्याची प्रक्रिया काय आहे?राज्यसभेच्या सभापतींना पदावरून हटवण्यासाठी किमान 50 सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांसह प्रस्ताव सचिवालयाकडे पाठवावा लागतो. ही सूचना किमान 14 दिवस अगोदर दिल्यानंतर, राज्यसभेत उपस्थित असलेल्या बहुमताच्या आधारे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो लोकसभेत पाठवावा लागतो. राज्यसभेचे सभापती देशाचे उपराष्ट्रपतीदेखील आहेत. अशा स्थितीत त्यांना पदावरुन हटवण्यासाठी हा प्रस्ताव लोकसभेतही मंजूर होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा