शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर टीका करावी, आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायला तयार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 11:27 IST

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पीएम मोदींनी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या धोक्याचाही उल्लेख केला आणि सतर्क राहण्यास सांगितले.

नवी दिल्ली: आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पीएम मोदींनी सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार आहे, सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार आहे. फक्त संसद सुरळीत चालू द्या, असे आवाहान विरोधकांना केले.

अधिवेशनात देशहिताची चर्चा व्हावी

पीएम पुढे मोदी म्हणाले, 'देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. संसदेचे हे अधिवेशन खूप महत्त्वाचे आहे. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात देशाच्या प्रगतीची चर्चा व्हावी, असे देशातील प्रत्येक नागरिकाला वाटते. देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी संसदेत चर्चा व्हायला हवी. भारताच्या संसदेने या अधिवेशनात आणि येणाऱ्या सर्व अधिवेशनांमध्ये स्वातंत्र्यप्रेमींच्या भावनांनुसार देशहिताची चर्चा व्हावी, अशी देशाची इच्छा आहे.' 

विरोधकांनी सर्वांचा मान राखावा

'संसदेचे हे सत्र आणि येणारे पुढील सत्रात देशाच्या प्रगतीसाठी खासदारांनी चर्चा करावी. संसदेचे हे सत्र विचारांची समृद्धी दाखवणारा, दूरगामी प्रभाव निर्माण करणारा सकारात्मक निर्णय ठरावे. भविष्यात संसद कशी चालवायची, तुम्ही किती चांगले योगदान दिले, किती सकारात्मक काम केले, या तराजूत तोलायला हवा. अधिवेशन कोणी बंद पाडले, हा निकष नसावा. सरकारच्या विरोधात, धोरणांच्या विरोधात आवाज उठवा, पण संसदेची प्रतिष्ठा, अध्यक्षांची प्रतिष्ठा, खुर्चीचा मान राखून आपण आचरण केले पाहिजे, असे आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केले.

अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून ते 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या दरम्यान एकूण 19 कामकाजाचे दिवस असतील. सुमारे 30 विधेयके संसदेत मांडली जातील, त्यात कृषीविषयक कायदे मागे घेण्याशी संबंधित विधेयकाचा समावेश आहे. कृषी कायदे निरसन विधेयक-2021 लोकसभेत विचारार्थ आणि पास होण्यासाठी सूचीबद्ध केले गेले आहे. लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आणले जाईल. पण, हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ सुरू राहण्याची शक्यता आहे. 

सर्वपक्षीय बैठकीत मोदींची अनुपस्थितीहिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. संरक्षण मंत्री आणि लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंह यांनी अर्थपूर्ण कामकाज आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व पक्षांचे सहकार्य मागितले. लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने नियमांनुसार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीत सरकारच्या वतीने सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस