नवी दिल्ली : लोकसभेत नि:पक्ष राहण्याचा व नियमानुसार सभागृहाचे कामकाज हाताळण्याचाच प्रयत्न आपण कायम केला असल्याचे सांगून नियम मोडून सभागृहात बोलण्याचा कोणत्याही सदस्याला विशेषाधिकार नसल्याचे सभापती ओम बिर्ला यांनी नमूद केले. बिर्ला यांच्याविरुद्ध काँग्रेससह विरोधी पक्षांनी दाखल केलेला ‘संकल्प’ फेटाळला गेल्याबद्दल सभापती बिर्ला यांनी सदस्यांचे आभार मानले. आपण संपूर्ण निष्ठा आणि घटनात्मक मर्यादांमध्ये राहून जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. बिर्ला म्हणाले, ‘काही सदस्यांना विरोधी पक्षनेते हे सभागृहापेक्षा उच्च स्थानी असल्याचे आणि ते कोणत्याही विषयावर बोलू शकतात, असे वाटते. मात्र, असा विशेषाधिकार कुणालाही नाही. संसदेतील प्रक्रिया, नियमानुसारच बोलण्याचा हा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे.’
माइक बंद करण्याचा सभापतींना अधिकार नाही
सभागृहात विरोधी पक्ष बोलत असताना माईक बंद केले जात असल्याच्या आरोपावर बिर्ला म्हणाले, ‘सभागृहाचा अध्यक्ष या नात्याने सदस्यांचे माईक बंद करण्याचा सभापतींना अधिकारच नाही. असे माईक ऑन-ऑफ करता येणारे स्वीचही माझ्याकडे नाही.
विरोधी पक्षातील जे सदस्य पीठासीन अधिकारी म्हणून या आसनावर असतात त्यांना हे चांगले माहिती आहे. पंतप्रधान असोत किंवा मंत्री, प्रत्येकाला सभागृहात बोलण्यासाठी सभापतींची परवानगी घ्यावीच लागते.
Web Summary : Speaker Om Birla emphasizes parliamentary proceedings must adhere to rules. No member has special privileges to speak outside procedure. Birla denied microphones are deliberately switched off, stating he lacks such controls. Everyone, including the PM, needs permission to speak.
Web Summary : अध्यक्ष ओम बिरला ने जोर दिया कि संसदीय कार्यवाही नियमों का पालन करे। किसी भी सदस्य को प्रक्रिया से बाहर बोलने का विशेषाधिकार नहीं है। बिरला ने इनकार किया कि माइक्रोफोन जानबूझकर बंद किए जाते हैं, उन्होंने कहा कि उनके पास ऐसे नियंत्रण नहीं हैं। प्रधानमंत्री सहित सभी को बोलने की अनुमति लेनी होती है।