नवी दिल्ली : संसदेत बुधवारी सलग चौथ्या दिवशी गोंधळामुळे कामकाज ठप्प झाले. बिहारमधील मतदारयाद्यांच्या पुनरावलोकनाचा मुद्दा पुन्हा तापला. यावर तत्काळ चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली. यादरम्यान प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी काही पूरक प्रश्नांची उत्तरे दिली.सभागृहांत बॅनरबाजीलोकसभेत काही सदस्यांनी बिहार व इतर मुद्द्यांवर आक्रमक होत बॅनर आणि पोस्टर्स फडकावली. यावर पीठासीन अधिकारी कृष्णाप्रसाद तेन्नेटी यांनी हा प्रकार नियमाविरुद्ध असल्याचे सांगून सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दुपारी दोनच्या सुमारास सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यसभेत निवृत्त सदस्यांना निरोपराज्यसभेत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना सदस्यपदाची शपथ देण्यात आली, तर एन. चंद्रशेखरन, एम. मोहम्मद अब्दुल्ला, एम. षणमुगम, वायको, अम्बुमनी रामदास या सदस्यांना निवृत्तीनंतर निरोप देण्यात आला. संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळात प्रश्नोत्तरे झाली. यात सरकारच्या वतीने मंत्र्यांनी यावर उत्तरे दिली. यावेळी उत्तरादाखल खालील माहिती देण्यात आली. > घरातील ज्येष्ठांच्या सेवेसाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ३० दिवसांची सुटी.>भारताच्या पहिल्या मानवरहित ‘गगनयान’ या अंतराळ मोहिमेची तयारी प्रगतिपथावर. देशात उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची एकूण ३७१ पदे रिक्त.> जलजीवन मिशनच्या कामांत दुर्गम भाग, राज्याच्या निधीमध्ये विलंब आणि काही भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य या अडचणी.