शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

गंभीर विषयांनी दणाणली संसद

By admin | Updated: December 15, 2015 01:39 IST

रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण काढतांना दिल्लीच्या शकुरबस्ती भागात ६ महिन्यांच्या तान्ह्या मुलीचा दुर्देवी मृत्यू , पंजाबमधे अबोहर येथे अकाली दल नेत्याच्या फार्म हाऊ सवर

नवी दिल्ली : रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण काढतांना दिल्लीच्या शकुरबस्ती भागात ६ महिन्यांच्या तान्ह्या मुलीचा दुर्देवी मृत्यू , पंजाबमधे अबोहर येथे अकाली दल नेत्याच्या फार्म हाऊ सवर २ दलितांचे हात पाय कापल्याची निर्घृण घटना व केरळात पंतप्रधानांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री ओमेन चांडी यांना टाळण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या सूचना या तीन कारणांवरून राज्यसभा आणि लोकसभेत काँग्रेस सदस्यांनी सोमवारी प्रचंड गदारोळ केला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, अर्थमंत्री अरूण जेटली गृहमंत्री राजनाथसिंग व राज्यमंत्री नकवींनी तिन्ही घटनांचा थोडक्यात खुलासा सरकारतर्फे केला तथापि त्यांच्या खुलाशाने समाधान न झाल्याने काँग्रेसने लोकसभेत सभात्याग केला तर विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज वारंवार तहकूब झाले.शकुरबस्तीत रेल्वेच्या जमिनीवरचे अतिक्रमण काढण्यापूर्वीच लहान मुलीचे निधन झाले होते, असा खुलासा करीत रेल्वेमंत्री प्रभू लोकसभेत म्हणाले, तीनदा नोटीसा बजावल्यानंतरही रेल्वेच्या संपत्तीवरील अतिक्रमण झोपडपट्टीवासियांनी हटवले नाही. अखेर रेल्वेला कारवाई करावी लागली. अतिक्रमण हटवण्याची मोहिम दुपारी १२ वाजता सुरू झाली. त्यापूर्वी सकाळी १0.३0 च्या सुमारासच मुलीचे निधन झाल्याचे वृत्त सर्वांना समजले होते. गाठोड्याखाली दबल्याने लहान मुलगी दगावली, असे मृत मुलीच्या नातेवाईकांनी सांगीतले. याच स्वरूपाचा खुलासा रेल्वे अधिकाऱ्यांनी रविवारी केला होता. प्रभूंनी त्याचा पुनरूच्चार केला.पंजाबमधे फाजिलका जिल्ह्यातील अबोहर येथे अकाली दलाच्या शिवलाल डोडा नामक नेत्याच्या फार्म हाऊ सवर दोन दलितांचे हात पाय कापल्याची निर्घृण घटना घडली. यापैकी भीम टाक हा मरण पावला असून एक हात गमावलेला गुरजंतसिंग रूग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत आहे. या संदर्भात ११ लोकांविरूध्द गुन्हा दाखल झाला तरी परिसरात प्रचंड तणाव आहे. पंजाबमधले अकाली दल भाजप आघाडीचे सरकार त्वरित बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेस व बसपने राज्यसभेत केली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व मायावतींनी हा विषय राज्यसभेत उपस्थित करताच संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार नकवी म्हणाले, राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडीत हा विषय आहे. पंजाब सरकारने संबंधितांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी राज्यसभेचे कामकाज रोखणे योग्य नाही. उपसभापती कुरियन यांनीही काँग्रेस खासदारांना समजावण्याचा प्रयत्न केला तथापि गदारोळ थांबला नाही, अखेर चारदा तहकूब झालेल्या राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.केरळात एसएनडीपी संस्थेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान सोमवारी केरळला गेले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री ओमेन चांडी भूषवणार होते. तथापि पंतप्रधान कार्यालयातून एका ओएसडीचा फोन गेल्यावर मुख्यमंत्र्यांना दिलेले निमंत्रण सदर संस्थेने मागे घेतले असा आरोप काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मांनी केला. ते म्हणाले, पंतप्रधानांचा दौरा ज्या प्रकारे होतो आहे, तो केवळ मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर समस्त केरळच्या जनतेचा अपमान आहे. सदर आरोपाचे खंडन करतांना राज्यसभेत अरूण जेटली व लोकसभेत राजनाथसिंग म्हणाले, एसएनडीपीही केरळातील एक खाजगी संस्था आहे. कार्यक्रमाला कोणालानिमंत्रित करावे आणि कोणाला टाळावे, हा सर्वस्वी त्या संस्थेचा अधिकार आहे. संस्थेने मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले होते मात्र दरम्यानच्या काळात संस्थेच्या सचिवाविरूध्द राज्य सरकारने काही कारवाई केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना दिलेले निमंत्रण सदर संस्थेने मागे घेतले, अशी माहिती हाती आली आहे. केंद्र सरकार अथवा पंतप्रधान कार्यालयाने त्यात कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. (विशेष प्रतिनिधी)तीनही विषयांवर उभय सभागृहात काँग्रेसचे सदस्य सर्वाधिक आक्रमक होते. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास गोंधळातच पार पडला. शून्यप्रहरात याच विषयांवर काँग्रेसने सभात्याग केला. राज्यसभेत प्रचंड गदारोळात सुषमा स्वराज यांनी इस्लामाबाद दौऱ्याचे निवेदन वाचून दाखवले. सभागृहात गदारोळ सुरूच होता. अखेर गोंधळ घालणाऱ्या सदस्यांपुढे उपसभापतींना झुकावेच लागले. त्यात चार वेळा राज्यसभेचे कामकाज तहकूब झाले.