नवी दिल्ली - लोकसभेत गुरुवारी कामकाज सुरू असताना आपसांत गप्पा मारणाऱ्या खासदारांवर अध्यक्ष ओम बिर्ला प्रचंड भडकले. एवढी सखोल चर्चा करायची असेल तर सभागृहाबाहेर जा, असा स्पष्ट इशारा ओम बिर्ला यांनी सदस्यांना दिला.
प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाकांवरील काही सदस्य आपसांत बोलत होते. यामुळे इतर सदस्यांची अडचण होत होती. यावर बिर्ला यांनी कामकाजात बाधा निर्माण करणाऱ्यांची आता नावे घेतली जातील, असे सुनावले. काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांनी सहकाऱ्यांशी कमी चर्चा करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १८ तास चर्चासंसद अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत एकूण १८ तास चर्चा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देतील. त्यानंतर ५ ते ११ फेब्रुवारीदरम्यान अर्थसंकल्पावर चर्चा होईल. यावर ११ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण उत्तर देतील.
Web Summary : Lok Sabha Speaker Om Birla rebuked MPs for conversing during Question Hour. He warned of naming disruptive members and suggested less discussion, urging serious talks outside the House. Parliament to debate President's address for 18 hours.
Web Summary : लोकसभा अध्यक्ष ओम बिड़ला ने प्रश्नकाल के दौरान बातचीत कर रहे सांसदों को फटकारा। उन्होंने व्यवधान डालने वाले सदस्यों का नाम लेने की चेतावनी दी और कम चर्चा करने का सुझाव दिया, गंभीर बातचीत बाहर करने को कहा। संसद में राष्ट्रपति के अभिभाषण पर 18 घंटे बहस होगी।