शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

'राघव आणि परिणीतीचे मनापासून अभिनंदन', AAP खासदाराने केली नात्याची पुष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 15:06 IST

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चढ्ढा एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे.

Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. परिणीतीचे नाव आम आदमी पार्टीचे (AAP) खासदार राघव चढ्ढासोबत जोडले जात आहे. परिणीती आणि राघव मुंबईमध्ये एकत्र स्पॉट झाल्यानंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्या समोर आल्या. दरम्यान, आता आप खासदार संजीव अरोरा यांनी त्यांच्या ट्विटद्वारे या दोघांच्या नात्याची पुष्टी केली आहे.

आप खासदाराने केले अभिनंदन राघव चढ्ढासोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांवर परिणीती चोप्राने आतापर्यंत मौन बाळगले आहे. तसेच, राघव चढ्ढानेही मीडियासमोर परिणीतीबाबत बोलण्यास नकार दिला आहे. अशातच चाहते त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत. यादरम्यान, आप खासदार संजीव अरोरा यांनी या दोघांच्या नात्याला दुजोरा दिला आहे. अरोरा यांनी ट्विटरवरुन दोघांचे अभिनंदन केले  आहे.

संजीव अरोरा यांनी आपल्या ट्विटमध्ये परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा फोटो शेअर केला आहे. दोघांच्या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, मी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे मनापासून अभिनंदन करतो. मला आशा आहे की, दोघांचा सहवास प्रेम आणि आनंदाने भरलेला असेल. माझ्या शुभेच्छा!'

नात्याची चर्चा कशी सुरू झाली?परिणीती चोप्रा नुकतीच राघव चढ्ढासोबत मुंबईत स्पॉट झाली होती. दोघेही एकत्र डिनर डेट एन्जॉय करताना दिसले. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. मात्र, परिणीती आणि राघव चढ्ढा यांनी अद्याप या वृत्तांवर अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. राघव चढ्ढा यांना परिणीतीबद्दल विचारण्यात आले असता, तुम्ही मला राजकारणाचे प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल प्रश्न विचारू नका, असे ते म्हणाले.

परिणीती अभिनयात पारंगत राघव चढ्ढा आणि परिणीतीबद्दल बोलायचे झाले तर दोघांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले आहे. दोघेही अभ्यासात खूप हुशार. मात्र, परिणीती चोप्राने तिचे करिअर चित्रपटांमध्ये केले. बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. तिने नेहमीच आपल्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. आता ती 'चमकीला' आणि 'कॅप्सूल गिल'मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :Parineeti Chopraपरिणीती चोप्राAAPआपbollywoodबॉलिवूडPoliticsराजकारण