शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: शौर्यपदक विजेत्या मुलाच्या अंत्यविधीला निवृत्त फौजी असलेल्या वडिलांची २ हजार कि.मी. परवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 05:32 IST

संडे अँकर। विशेष विमानाअभावी करावा लागला रस्त्याने खडतर प्रवास

नवी दिल्ली : भारतीय लष्करातील शौर्यपदक विजेते कर्नल नवज्योतसिंग बाल यांचे दुर्मिळ कर्करोगाने बंगळुरू येथील लष्करी इस्पितळात शुक्रवारी दुर्दैवी निधन झाले. याहून दुर्दैव असे की, लष्करातूनच निवृत्त झालेल्या त्यांच्या ८३ वर्षांच्या वडिलांसह अन्य कुटुंबियांना अंत्यविधीला येण्यासाठी लष्कराचे विशेष विमान उपलब्ध करून द्यायचे की नाही याचा निर्णय ‘लालफिती’त अडकल्याने या दु:खी कुटुंबास गुरुग्राम ते बंगळुरू हा सुमारे दोन हजार कि.मी.चा प्रवास ‘लॉकडाऊन’मध्ये करण्याचे दिव्य त्यांच्या नशिबी ाले.

कर्नल नवज्योतसिंग यांचे ८३ वर्षांचे वडील, आई व भाऊ असे कुटुंबीय शुक्रवारी दुपारी गुरुग्रामहून रवाना झाले व ते रविवारी सकाळपर्यंत बंगळुरू येथे पोहोचणे अपेक्षित आहे.सैन्य दलातील अधिकाऱ्याचे पार्थिव त्याच्या घरी नेण्यासाठी सैन्य दलाचे विमान वापरता येते. परंतु सैन्य दलात नसलेल्या त्याच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी सैन्य दलाच्या विमानाने आणायचे असेल तर त्यासाठी विशेष परवानगी लागते.निडर लष्करी कमांडो गमावलाच्कर्नल नवज्योतसिंग बाल यांच्या अकाली निधनाने ‘भीती हा शब्दही माहीत नसलेला एक निडर अधिकारी गमावल्याची’ खंत लष्करी वर्तुळात व्यक्त होत आहे. लष्कराच्या ‘२ पॅरा एसएफ युनिट’ या विशेष कमांडो तुकडीचे ते कमांडर होते.च्युनिटचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर लगचेच त्यांनी काश्मीरच्या लोलाब खोºयात हातघाईच्या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा केला होता. त्याबद्दल ‘शौर्यपदक’ हे दुसºया क्रमांकाचे पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले होते; पण दुर्दैवाने त्यांना कर्करोग झाला. त्यातच त्यांचा उजवा हात गेल्या वर्षी कापून टाकावा लागला.च्तरीही लष्करी अधिकाºयास साजेशा सळसळत्या चैतन्याने ते दैनंदिन कामे करीत होते. परंतु अखेर कर्करोगाने त्यांच्यावर मात केली. त्यांच्या पश्चात पत्नी व अनुक्रमे आठ व चार वर्षांचे दोन मुले आहेत.दिरंगाई...दिवंगत कर्नल नवज्योतसिंग यांचे वडीलही लष्कराचे निवृत्त अधिकारी आहेत व त्यांचे वय ८० च्या पुढे आहे हे लक्षात घेऊन लष्कराने त्यांच्यासाठी हवाई दलाचे विमान वापरायची परवानगी घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अर्ज केला. ‘लालफिती’च्या दिरंगाईमुळे या कुटुंबाला रस्त्याने प्रवास करावा लागला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूBengaluruबेंगळूरIndian Armyभारतीय जवान