शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

EXCLUSIVE- पालकांनो मुलांना शाळेत पाठवताना सुरक्षा यंत्रणेकडेही लक्ष द्या- डॉ. हरिश शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 12:45 IST

पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

ठळक मुद्देगुरुग्राम येथिल रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षांच्या मुलाची हत्या करण्याचं प्रकरण घडलं. शाळेमध्ये शिकायला गेलेल्या पाल्याबाबत घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती. यापुढे पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

मुंबई, दि.१२- गुरुग्राम येथिल रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षांच्या मुलाची हत्या करण्याचं प्रकरण घडलं. शाळेमध्ये शिकायला गेलेल्या पाल्याबाबत घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती. त्यामुळेच यापुढे पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं. पालक शिक्षक संघटनेनेही या मुद्द्याकडे लक्ष द्यावं, असं मत डॉ. शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. प्रत्येक शाळेत चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी तयार केली जावी आणि त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा समावेश असावा. शाळा व मुलांच्या कुटुंबांचं एक संयुक्त कुटुंबच बनलं पाहिजे, असं डॉ. शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.

मुलाला शाळेत पाठवताना पालकांनी काही प्रश्न स्वतःला विचारावेत असे त्यांनी सुचवले. ते प्रश्न पुढीलप्रमाणे - 

- सिक्युरिटी कॅमेऱ्यात टिपली जाणारी हालचाल सुरक्षारक्षकांद्वारे सतत लाइव्ह तपासली जात आहे का?- मुलांची स्वच्छतागृहं फक्त मुलंच वापरत आहेत की प्रौढ लोकही त्यामध्ये जात आहेत ?- ज्या स्वच्छतागृहात विद्यार्थी जातात त्यामध्येच स्कूलबसचे कंडक्टर आणि त्याचे चालक जातात का की ते वेगळे स्वच्छतागृह वापरतात?- प्रत्येक मजल्यावर महिला आणि पुरुष सुरक्षारक्षक आहेत का ?- सुरक्षारक्षकही सीसीटीव्हीच्या कक्षेत आहेत का ?- शाळा व महाविद्यालय एकाच प्रांगणात असेल तर महाविद्यालयाचे विद्यार्थी लहान मुलांचे स्वच्छतागृह वापरतात का ? तसे झाल्यास त्यांना अडवण्यास सुरक्षारक्षक आहेत का ?- शाळेची सुरक्षाव्यस्था मुख्याध्यापक नियमित तपासतात का ? - सर्व व्यवस्थेचे योग्य ऑडिट होतं का ?- मुलांकडून फिडबॅक किंवा सूचना मागवल्या जातात का ? त्यावर काही अंमलबजावणी होते का ?-- सुरक्षाव्यवस्था सक्षम असावी यासाठी शाळेचे शिक्षक जागरुक आहेत का ?