शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बस व टॅक्सीमध्ये 1 एप्रिलपासून पॅनिक बटन सक्तीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 15:10 IST

भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं 1 एप्रिलपासून बस आणि टॅक्सीमध्ये पॅनिक बटन बसवणं सक्तीचं केलं आहे. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून हे बटन कार्यान्वित होणार असून, 1 एप्रिल 2018पासून हे प्रत्येक बस आणि टॅक्सीमध्ये बसवणं सक्तीचं करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं 1 एप्रिलपासून बस आणि टॅक्सीमध्ये पॅनिक बटन बसवणं सक्तीचं केलं आहे. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून हे बटन कार्यान्वित होणार असून, 1 एप्रिल 2018पासून हे प्रत्येक बस आणि टॅक्सीमध्ये बसवणं सक्तीचं करण्यात आलं आहे. तसेच या मुदतीत कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचं भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. परंतु ही सक्ती रिक्षा किंवा ई-रिक्षांना लागू नसेल, असंही भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपत्कालीन स्थितीत साहाय्यभूत व्हावे, यासाठी सर्व मोबाइल फोनमध्ये पॅनिक बटनसारखी सुविधा देऊ शकणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याच्या सूचना सरकारने मोबाइल उत्पादक कंपन्यांना केल्या होत्या. दूरसंचार विभागाने या संबंधीचा आदेश जारी केला आहे. या आधी विभागाने कंपन्यांना 1 जानेवारी 2017 नंतर विकणाऱ्या सर्व फोनमध्ये ही सुविधा देण्याचे आदेश दिले होते. आता सध्या अस्तित्वात असलेल्या फोनमध्येच ही सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे. हँडसेट उत्पादक कंपन्यांना दिलेल्या निर्देशांत दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, सध्या ग्राहकांकडे असलेल्या हँडसेटमध्ये पॅनिक बटनसारखी सुविधा देणारे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यासाठी किरकोळ विक्री केंद्रांवर व्यवस्था करण्यात यावी.जारी आदेशानुसार की-पॅडवरील 5 किंवा 9 क्रमांकाचे बटन दाबल्यास आपत्कालीन क्रमांक 112वर फोन लागेल. 112 हा आपत्कालीन क्रमांक 1 जानेवारीपासून कार्यान्वित होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व आपत्कालीन सेवांच्या क्रमांकाची जागा हाच एकमेव क्रमांक घेईल. सध्या पोलिसांसाठी 100, तर अ‍ॅम्बुलन्स सेवेसाठी 102 हा क्रमांक वापरला जातो. 112 क्रमांकाची सेवा पूर्णांशाने सुरू झाल्यानंतर हे क्रमांक बंद होतील. महिला प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये ‘पॅनिक बटन’, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहनाचा शोध घेणारे उपकरण लावणे बंधनकारक करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. 

‘निर्भयाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सर्व सार्वजनिक बसगाड्यांमध्ये आपत्कालीन पॅनिक बटन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस उपकरण लावणे अनिवार्य करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे’, असे गडकरी म्हणाले होते. नवी दिल्ली येथे राजस्थान सरकारच्या एका पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ केल्यानंतर गडकरी पत्रकारांशी बोलत होते. या प्रकल्पांतर्गत राजस्थान राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपत्कालीन बटन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेल्या आपल्या दहा लक्झरी बसगाड्या व दहा सामान्य बसगाड्यांचे परिचालन करेल. या यंत्रणेची निगराणी स्थानिक पोलीस नियंत्रण कक्षातून केली जाणार आहे.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी